Weight Loss | टीम कृषीनामा: आजकाल वाढते वजन ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी प्रत्येक दुसऱ्या व्यक्ती झटत आहे. यासाठी बहुतांश लोक जिमपासून ते डायटपर्यंत सर्व पर्यायांचा अवलंब करतात. मात्र, काही केल्या वजन कमी होत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिरा पाण्याचे सेवन करू शकतात. जिरा पाण्याचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. जिरा पाण्यामध्ये आढळणारे गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करतात. यामध्ये मॅग्नेशियम, आयरन, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादी घटक माफक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे जिरा पाण्याचे सेवन केल्याने शरीरात चरबी जमा होत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीने जीरा पाण्याचे सेवन करू शकतात.
जिरा पाणी आणि कढीपत्ता (Cumin water and curry leaves-For Weight Loss)
वजन कमी करण्यासाठी जिरा पाणी आणि कढीपत्ता उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरे आणि सात ते आठ कढीपत्ता टाकून ठेवावा लागेल. त्यानंतर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुम्हाला या पाण्याचे सेवन करावे लागेल. हे पेय प्यायल्याने शरीरातील मेटाबोलिझम रेट वाढण्यास मदत होते. परिणामी वजन कमी होऊ शकते.
जिरा पाणी आणि लिंबू (Cumin water and lemon-For Weight Loss)
वजन कमी करण्यासाठी लिंबू खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर तुम्ही जिरा पाणी आणि लिंबाच्या मदतीने वजन नियंत्रणात आणू शकतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरे आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे सर्व साहित्य टाकून तुम्हाला पाणी चांगले उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या पाण्याचे गाळून सेवन करावे लागेल. दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही या पाण्याचे सेवन करू शकतात. नियमित हे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
जिरा पाणी आणि दालचिनी (Cumin water and lemon-For Weight Loss)
वजन कमी करण्यासाठी दालचिनी आणि जिरा पाणी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरे आणि दालचिनीचा एक तुकडा मिसळून घ्यावा लागेल. तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या पाण्याचे उकळून सेवन करू शकतात. या पाण्याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहू शकते.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतींचा वापर करू शकतात. त्याचबरोबर मसल्स गेम करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा आहारात समावेश करू शकतात.
शेंगदाणे (Peanuts For Muscle Gain)
शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. कोणत्याही ड्रायफ्रूटच्या तुलनेमध्ये शेंगदाण्यात जास्त प्रमाणात प्रोटीन आढळून येते. त्याचबरोबर यामध्ये माफक प्रमाणात 20 ओमीनो ॲसिड देखील उपलब्ध असते. मसल्स गेन करण्यासाठी शेंगदाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
बीन्स (Beans For Muscle Gain)
मसल्स गेन करण्यासाठी बीन्सचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि अमिनो ॲसिड आढळून येते. एक कप बीन्समध्ये सुमारे 15 ग्रॅम प्रोटीन आढळून येते. त्यामुळे मसल्स गेन करण्यासाठी बीन्सचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.
पनीर (Paneer For Muscle Gain)
पनीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. 100 ग्राम पनीरमध्ये 20 ग्रॅम प्रोटीन आढळून येते. त्यामुळे मसल्स गेन करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पनीरचा समावेश करू शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या