केंद्र सरकार नवी योजना; शेती अवजारांसाठी देणार ८०% अनुदान, असा घ्या लाभ

मुंबई – केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एका योजनेद्वारे मोठी मदत करण्याचा निर्णय. शेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात उपकरणांशिवाय शेती करणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे.

राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस

याचीच दखल घेत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी त्यांच्या फार्म मशिनरी बँकेत सीड फर्टीलायजर ड्रील, प्लाऊ, थ्रेसर, टिलर, रोटावेटर यांसारख्या उपकरणाची अनुदानीत रकमेवर खरेदी करु शकतात असे सांगितले आहे.

तसेच अलिकडेच्या काळात ही गोष्ट केंद्र सरकारकडून लक्षात घेऊन ही योजना राबवत आहे, आता उपकरणे भाडे तत्त्वावर उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यासाठी म्हणून फार्म मशिनरी बँकेसाठी सरकारकडून गावे एकत्र केले जात आहेत.

देशातल्या 5 बँकांत मोठी भरती, अर्ज करून मिळवा नोकरी

तुम्हाला जर या बँकेसाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळवायची असल्यास तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. तुमच्या भागातील ई – मित्र कियोस्कवर ठराविक रक्कम भरुन अर्ज करावा लागणार आहे. तसेच या अर्जासोबत फोटो, उपकरण किंवा यंत्राच्या खरेदी बिलाची प्रत, आधार कार्ड, बँक खात्याच्या पासबुकची प्रत आणि इतरही काही पुरावे जोडावे लागणार आहेत सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कृषी क्षेत्रातील कोणत्याही योजनेअंतर्गत एका यंत्र किंवा उपकरणासाठी तीन वर्षांमध्ये फक्त एकदाच सबसिडी दिली जाणार आहे असे पण सांगण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये सरकारकडून ८० % सबसिडीसोबतच इतरही प्रकारची मदत देऊ करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्यदायी जायफळ खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

कडू कारल्याचे गुणकारी फायदे, जाणून घ्या