अमरावती – जिल्ह्याचा विकास करताना मुख्यतः ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करून ग्रामविकासाला चालना देण्याची सूचना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली .
जिल्ह्यातील गावागावांना जोडणाऱ्या अनेक ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा कामांचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या .654 कोटी 25 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले .
शिरजगाव कसबा, थुंगाव, पिंप्री ,वायंगाव ,खारतळेगाव, भातकुली, गणोजादेवी येथील रस्त्यांच्या सुधारणा करण्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या विकास कामाची किंमत 130 लाख रुपये आहे. येथील विर्शी ,वायगाव रस्त्याच्या सुधारणा कामाचेही भूमीपूजन करण्यात आले. या विकास कामासाठी 200 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे .
टाकरखेडा ,पुसदा ,रोहणखेडा ,माहुली जहांगीर रस्त्याची पुलासह सुधारणा करण्यात येणार आहे. हा रस्ता 69 किलोमीटरचा आहे. या दुरुस्ती कामासाठी 100 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचेही भूमीपूजन यावेळी करण्यात आले .
तळवेल, साऊर, टाकरखेडा, आष्टी, वायगांव ,खारतळेगाव या रस्त्याची लांबी 23 किलोमीटर असून यासाठी 150 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रस्त्याच्या सुधारणा कामाचेही भूमीपूजन यावेळी करण्यात आले .
साऊर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या बांधकामासाठी 28 .50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे .तसेच येथील मूलभूत सुविधा निधीअंतर्गत काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाचेही भूमीपूजन करण्यात आले आहे. या कामासाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे .
त्याचप्रमाणे मौजा गोपाळपूर येथील पेढी नदीवरील पूर संरक्षणाच्या कामाचे भूमीपूजन करून पालकमंत्र्यांनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. या विकास कामासाठी 30.75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विकास कामे त्वरित पूर्ण करण्याचे सूचना श्रीमती ठाकूर यांनी यावेळी संबंधितांना दिल्यात.
जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख, तहसीलदार नीता लबडे , नायब तहसीलदार विजय मांजरे , उपअभियंता अनिल तसेच सरपंच , उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते .
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- हवामान अंदाज! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता
- आवास योजनांचे उद्दिष्ट ३१ मार्च पर्यंत पूर्ण करा – उदय सामंत
- उकडलेले अंडे खाणार्या ९९% लोकांना माहित नाही ही गोष्ट, जाणून घ्या
- सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार – अनिल परब