‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत मूल्यसाखळी वाढविण्याचा प्रयत्न करा – कृषिमंत्री

पुणे – बाळासाहेब ठाकरे कृषी व्ययसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत (स्मार्ट) शेतकरी कंपन्यांनी महिला सभासदांना पूर्णतः सहभागी करून पारदर्शकपणे व्यवहार करावे आणि मूल्यसाखळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन कृषिमंत्री (Minister of Agriculture) दादाजी भुसे यांनी केले. ‘स्मार्ट’ (Smart) प्रकल्पांतर्गत अल्पबचत भवन येथे आयोजित अहमदनगर, पुणे व सोलापूर येथील प्रथम टप्प्यात मंजूर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यशाळेत … Read more

राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे विमा कंपन्यांकडून २ हजार ४५० कोटी रुपयांची पिकविम्याची नुकसान भरपाई

पुणे – राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या दूर करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करण्यात येतील. महिला शेतकरी आणि शेतमजूर यांचा सन्मान आणि  प्रतिष्ठा वाढविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री (Minister of Agriculture) दादाजी भुसे यांनी केले. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्यांची नुकसानभरपाईसाठी राज्य शासन … Read more

स्वयंपूर्ण गावासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा – दादाजी भुसे

पुणे – महिला शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी चारही कृषी विद्यापीठांनी (University of Agriculture) पुढाकार घेण्यासह शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करावे, असे आवाहन कृषिमंत्री  दादाजी भुसे यांनी केले. उद्यानविद्या महाविद्यालयाच्या चिमा सभागृहात आयोजित महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १०६ व्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय … Read more

बँकांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी – सतेज पाटील

कोल्हापूर – सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.  नागरिकांच्या बचत ठेवींचे संरक्षण करण्यासाठी बँकांनी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्याबरोबरच ठेवीदारांसाठी अभियानाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केल्या. अग्रणी जिल्हा कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक  पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहामध्ये झाली, यावेळी ते बोलत … Read more

विकास कामांना गती देण्यासाठी योग्य नियोजन करा – नितीन राऊत

नागपूर – डिसेंबर महिन्यापर्यंत खर्चाची स्थिती अल्प प्रमाणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता होती. पुन्हा महानगरपालिकेची आचारसंहिता प्रस्तावित असू शकते. अशा वेळी योग्य नियोजन करून विकास (Development) कामे पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी  केले. जिल्हा नियोजन समितीवरील कार्यकारी समितीची आढावा बैठक बचत भवन येथे  पार पडली. या … Read more

महिला शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – दादाजी भुसे

पुणे – राज्यातील महिला (Women) शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या दूर करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करण्यात येतील. महिला (Women) शेतकरी आणि शेतमजूर यांचा सन्मान आणि  प्रतिष्ठा वाढविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री (Minister of Agriculture) दादाजी भुसे यांनी केले. राज्य शासनाच्या वतीने २०२२ हे महिला शेतकरी सन्मान वर्ष … Read more

तापी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल – गृहमंत्री

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील तापी आणि गिरणा नदीच्या खोऱ्याचा भाग हा कापूस व केळी पिकासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तापी सहकारी सूतगिरणीचा (Spinning mill) जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले. तापी सहकारी सूतगिरणीच्या (Spinning mill)  धरणगाव रस्त्यावरील कार्यस्थळ परिसरात रेल मारुती जिनिंग व … Read more

राज्यात २०२२ पर्यंत सर्वत्र होणार गुणसंवर्ध‍ित तांदळाचे वितरण – छगन भुजबळ

मुंबई – ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले. मंत्रालयातील दालनात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गुणसंवर्धित तांदुळाच्या वितरणाचे … Read more

ओमिक्रॉन विषाणूसंदर्भात मेयो, मेडिकलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरु करा – नितीन राऊत

नागपूर – ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे ऑक्सिजनसह सर्व सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ओमिक्रॉन विषाणूपासून संभाव्य धोक्याच्या पातळीवर वरिष्ठ अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागीय टास्क … Read more

महिला बचत गटांच्या कौशल्यपूर्ण वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी – हसन मुश्रीफ

नाशिक – जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या रिक्त पदांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या कौशल्यपूर्ण वस्तूंच्या विक्रीसाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध कामांचा आढावा घेतांना ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) … Read more