Belpatra Leaves | बेलपत्राचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Belpatra Leaves | टीम कृषीनामा: बेलपत्राचा उपयोग भगवान शंकराच्या पूजेसाठी केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? बेलपत्र आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. बेलपत्राचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या सहज दूर होतात. कारण यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. बेलपत्राचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यास सोबतच शरीरातील अनेक आजार दूर होतात. बेलपत्राच्या पानाचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

डायबिटीससाठी फायदेशीर (Beneficial for diabetes-Belpatra Leaves Benefits)

बेलपत्राचे सेवन केल्याने डायबिटीस नियंत्रणात राहू शकते. यासाठी तुम्हाला बेलपत्र बारीक करून त्याचा रस काढून घ्यावा लागेल. त्यानंतर दिवसातून दोन वेळा तुम्हाला या रसाचे सेवन करावे लागेल. नियमित या रसाचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.

तापासाठी फायदेशीर (Beneficial for fever-Belpatra Leaves Benefits)

तापाच्या समस्येवर बेलपत्राची पाने एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ताप आल्यावर तुम्ही बेलपत्राच्या पाण्याचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला बेलाची 3 ते 4 पाने पाण्यात उकळून घ्यावी लागेल. त्यानंतर पाण्याचा रंग बदलेपर्यंत तुम्हाला हे पाणी उकळून घ्यावे लागेल. हे पाणी कोमट झाल्यावर तुम्ही त्याचे सेवन करू शकतात. या पाण्याचे सेवन केल्याने ताप कमी होऊ शकतो.

रक्त शुद्ध राहते (The blood remains pure-Belpatra Leaves Benefits)

बेलपत्र खाल्ल्याने रक्त शुद्ध होऊ शकते. यासाठी तुम्हाला बेलाच्या पानांचा रस काढून त्यामध्ये कोमट पाणी आणि थोडासा मध मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. या पेयाचे नियमित सेवन केल्याने रक्त शुद्ध होऊ शकते. त्याचबरोबर शरीर निरोगी राहू शकते.

शरीर थंड राहते (The body remains cool-Belpatra Leaves Benefits)

बेलपत्राचे सेवन केल्याने शरीर थंड राहू शकते. त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने तोंड येणे, जळजळ यासारख्या समस्या देखील कमी होऊ शकतात. बेलपत्राचे सेवन केल्याने शरीरातून थंड राहते. उन्हाळ्यामध्ये याचे सेवन करून उष्मघाताचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Beauty Tips | गुलाबासारखी कोमल आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर गुलाबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Green Coffee | वजन कमी होण्यापासून ते एनर्जी बूस्टरपर्यंत ‘हे’ आहेत ग्रीन कॉफी पिण्याचे फायदे

Muscle Gain | मसल्स गेन करण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो

Snoring | घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Ayurvedic Diet | स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश