Beauty Tips | गुलाबासारखी कोमल आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर गुलाबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Beauty Tips | टीम कृषीनामा: प्रत्येकालाच सुंदर आणि कोमल चेहरा (Glowing Skin) हवा असतो. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या प्रोडक्टचा वापर करतात. पण हे प्रॉडक्ट चेहऱ्याला दीर्घकाळ चमकदार ठेवू शकत नाही. चेहऱ्याला दीर्घकाळ कोमल आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही गुलाबाचा वापर करू शकतात. गुलाबाच्या मदतीने तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवू शकतात. यासाठी तुम्हाला गुलाबाची पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. गुलाबाची पेस्ट तयार करण्यासाठी तुम्हाला ताज्या फुललेल्या गुलाबाच्या पाकळ्या पूर्णपणे स्वच्छ करून घ्याव्या लागतील. त्यानंतर त्या पाकळ्या बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्यावी लागेल. चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पेस्टचा पुढील प्रमाणे वापर करू शकतात.

गुलाब आणि मध (Rose and honey-Beauty Tips)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाबाची पेस्ट आणि मधाचा फेस पॅक वापरू शकतात. यासाठी तुम्हाला गुलाबाची पेस्ट आणि मध व्यवस्थित मिसळून घ्यावा लागेल. या फेस पॅकमध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गुलाब जल देखील मिळू शकतात. तुम्हाला हा फेस पॅक चेहऱ्यावर वीस मिनिटे लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. हा फेस पॅक त्वचेला हायड्रेट ठेवू शकतो.

गुलाब आणि दही (Rose and curd-Beauty Tips)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पेस्टमध्ये दही मिसळू शकतात. दही त्वचेवर ब्लिच म्हणून काम करतो. त्यामुळे दह्याच्या मदतीने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही दही आणि गुलाबाच्या पेस्टचा फेस पॅक वीस मिनिटे चेहऱ्यावर लावू शकतात. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

गुलाब आणि चंदन (Rose and Sandalwood-Beauty Tips)

कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी गुलाब आणि चंदनाचा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो. गुलाबाच्या पेस्टमध्ये तुम्हाला चंदन पावडर आणि थोडे कच्चे दूध मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला हलक्या हाताने चेहऱ्यावर लावावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित सुकल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचा गुलाबासारखी कोमल आणि मुलायम होऊ शकतात.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील पर्यायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा वापर करू शकतात.

ऑलिव्ह ऑईल (Olive oil For Dry Skin Care)

त्वचेला चमकदार आणि मुलायम बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने चेहऱ्यावरील कोरडेपणाची समस्या देखील कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला आंघोळीच्या अर्धा तास आधी कोमट ऑलिव्ह ऑइल चेहऱ्यावर लावून मसाज करावी लागेल. ऑलिव्ह ऑइल अंघोळीच्या आधी चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या त्वचेवरील कोरडेपणाची समस्या कमी होऊ शकते.

बदाम तेल (Almond oil For Dry Skin Care)

बदाम तेलामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेचा रंग सुधारण्यासोबतच त्वचेवरील कोरडेपणाची समस्या देखील दूर करतात. यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदाम तेलाने मालिश करावी लागेल. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा लागेल. नियमित त्वचेला बदाम तेल लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Green Coffee | वजन कमी होण्यापासून ते एनर्जी बूस्टरपर्यंत ‘हे’ आहेत ग्रीन कॉफी पिण्याचे फायदे

Muscle Gain | मसल्स गेन करण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो

Snoring | घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Ayurvedic Diet | स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Skin Care With Tomato | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी टोमॅटोसोबत ‘या’ गोष्टींचा करा वापर