Curry Leaves | कढीपत्त्याच्या रसाचे सेवन केल्याने केसांना मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Curry Leaves | टीम कृषीनामा: अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा कढीपत्ता हा सर्वांच्याच ओळखीचा आहे. कढीपत्त्याच्या वापरानंतर पदार्थ अधिक जास्त चविष्ट बनतो. पण कढीपत्त्याचा उपयोग चांगल्या भाजीसाठीच नाही तर केसांची चांगली निगा (Hair Care) राखण्यासाठी देखील आपण करू शकतो. कढीपत्त्यामध्ये अँटी-एक्सीडेंट आणि अँटी-इम्प्लिमेंटरी घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी आढळते. जे केसांची निगा राखण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे कढीपत्ता केसांच्या अनेक समस्यापासून आपली सुटका करू शकतो. कढीपत्त्याच्या सहाय्याने केसांच्या पुढील समस्या दूर होऊ शकतात.

केसांच्या वाढीस चालना मिळते (Promotes hair growth – Curry Leaves)

केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी कढीपत्त्याचा रस फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला कढीपत्त्याच्या रसामध्ये मेथीच्या बिया मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला केसांना आणि टाळूवर साधारण वीस मिनिटे लावून ठेवावी लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.

केसातील कोंडा कमी होतो (Dandruff is reduced – Curry Leaves)

कढीपत्त्यामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म केसातील कोंडा दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला कढीपत्त्याचा रस केसांना आणि टाळूला लावावा लागेल. नियमित कढीपत्त्याचा रस केसांना लावल्यावर केसातील कोंडा दूर होऊ शकतो.

केस गळणे कमी होते (Hair fall is reduced – Curry Leaves)

तुम्ही जर केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर कढीपत्त्याचा रस तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला कढीपत्त्याच्या रसामध्ये खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला केसांना मुळापर्यंत लावावे लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने केस गळती काही दिवसात थांबू शकते. त्याचबरोबर या मिश्रणाचा वापराने केसांच्या इतर समस्या दूर होऊ शकतात.

केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही पुढील प्रमाणे देखील कढीपत्त्याचा वापर करू शकतात

केसांना कढीपत्ता लावण्यासाठी तुम्ही केस धुताना पाण्यात कढीपत्ता उकळून त्या पाण्याने केस देऊ शकतात. पाण्यात कडीपत्ता उकळून केस धुतल्याने केस गळणे कमी होतेच पण त्याबरोबर केस पांढरे होणेही कमी होतात.

केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही कढीपत्ता तेलात टाकूनही केसांना लावू शकतात. यासाठी तुम्ही कोणतेही नैसर्गिक तेल घेऊन त्यामध्ये कढीपत्ता उकळून घेऊन आणि नंतर त्याला थोडे कोमट करून केसांवर त्याची मसाज करू शकतात. तेलामध्ये कढीपत्ता उकळून ते तेल डोक्याला लावणे हा केसांच्या प्रत्येक समस्येसाठी एक रामबाण उपाय आहे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Diet For Dry Skin | कोरड्या आणि निर्जीव त्वचेच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Turmeric & Mint Tea | हळद आणि पुदिन्याचा हर्बल चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

CM Fellowship | सीएम फेलोशिप उपक्रम सुरू, इच्छुक उमेदवारांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Periods Cramps | मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Weather Update | राज्यात ‘या’ भागात थंडीचा जोर वाढणार, हवामान खात्याने वर्तवली शक्यता