Diet For Dry Skin | टीम कृषीनामा: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी होते. त्याचबरोबर वाढत्या वयामुळे आणि रसायनिक उत्पादनांच्या वापरामुळे त्वचा दिवसेंदिवस कोरडी होत जाते. रासायनिक उत्पादन वापरल्यामुळे त्वचा कोरडी तर होतेच पण त्याचबरोबर निर्जीव दिसायला लागतात. या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. तुम्ही पण जर कोरड्या त्वचेच्या समस्या पासून त्रस्त आहात? आणि त्यावर उपाय शोधत असाल, तरी बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोरड्या आणि निर्जीव त्वचेच्या समस्येवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. कोरड्या त्वचेची समस्या टाळण्यासाठी तुम्ही आहारात पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.
ॲवोकॅडो (Avocado – Diet For Dry Skin)
कोरड्या आणि निर्जीव त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ॲवोकॅडोचा समावेश करू शकतात. ॲवोकॅडोच्या पल्कमध्ये आढळणाऱ्या तेलामध्ये प्रोटीन्स आणि विटामिन्स आढळून येतात, जे त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यास मदत करतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये ॲवोकॅडोचा समावेश करू शकतात.
कोरफडीचा रस (Aloe vera juice – Diet For Dry Skin)
कोरफडीचा रसाचे सेवन केल्याने त्वचेवरील कोरडेपणा दूर होऊ शकतो. कोरफडीचा वापर क्रीम किंवा लोशन म्हणून देखील केला जातो. त्वचेला आतून निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करू शकतात. तुम्ही दररोज एक ग्लास कोरफडीच्या रसाचे सेवन करू शकतात.
गाजर (Carrot – Diet For Dry Skin)
कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात गाजराचा समावेश करू शकतात. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई आणि केरोटीन आढळून येते, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. गाजराचे नियमित सेवन केल्याने त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होऊ शकतात.
त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही आहारात वरील गोष्टीसोबतच काकडीचा पुढीलप्रमाणे वापर करू शकतात
काकडीची कोशिंबीर (Cucumber Salad for Skin Care)
त्वचेला आतून पोषण देण्यासाठी तुम्ही काकडीचे कोशिंबीर स्वरूपात सेवन करू शकतात. रोज काकडीची कोशिंबीर खाल्ल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने त्वचा चमकदार आणि मऊ दिसू लागते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते. त्यामुळे काकडीच्या कोशिंबिरीचे सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहते.
काकडीचा रस (Cucumber Juice for Skin Care)
तुम्हाला जर चमकदार आणि गोरी त्वचा हवी असेल, तर तुम्ही नियमित काकडीच्या रसाचे सेवन करू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी काकडीचा रस प्यायल्याने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. परिणामी त्वचेवरील चमक वाढू शकते. त्याचबरोबर त्वचा हायड्रेट राहू शकते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या