कापूस पिकाची लागवड

नगदी पिकात महत्त्वाचे पीक कापूस असून पांढरे सोने म्हणून त्यास संबोधले जाते. देशात उत्पादन होणार्‍या क्षेत्रापैकी सर्वसाधारण १/३ क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. प्रामुख्याने ज्या भागात उन्हाळी पीक घेतले जाते त्या भागातच कमी पाण्यात व ६ महिन्यात बागायत कापूस पिकाचे उत्पादन चांगले मिळत असल्याने आर्थिक गरजेसाठी या पिकास जास्त महत्त्व प्राप्त होते. उत्पादन वाढीसाठी सुधारित पद्धतीने लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेणे योग्य ठरेल.

हवामान : कापूस पिकास संपूर्ण कालावधीसाठी ५०० ते ६०० मि.मी. पाऊस लागतो.

पेरणीच्यावेळी ७५ ते १०० मि.मी. पाऊस व बियाणे उगवणीसाठी १५ डी सें.ग्रे. तापमानाची गरज असते.

रोप अवस्थेत शारीरिक वाढीसाठी २१ ते २८ डी. सें.ग्रे. तापमानाची गरज असते.

कापसाला जास्त फुले येण्याकरिता दिवसाचे तापमान २४ डी ते २८ डी सें.ग्रे. रात्रीचे तापमान २० डी. ते २१ डी. सें.ग्रे. लागते.

रात्रीचे २४ डी. सें.ग्रे. चे वर  दिवसाचे ३० डी. सें.ग्रे. चे वर तापमान गेल्यास फुले व पाते गळण्याचे प्रमाण वाढते.

जमीन : कापूस लागवडीसाठी जमीन निवडताना त्या जमिनीच्या नावातच काळी कापसाची जमीन हा उल्लेख येतो. परंतु बागायती कापूस लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, ७ ते ८ पर्यंत सामू आणि १ % पेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडावी. मात्र हंगामातील कापूस लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन योग्य असते. पूर्वहंगामी कापूस लागवड मे महिन्यात होत असल्यामुळे जास्त हलक्य जमिनीत किंवा खोल काळ्या जमिनीत या पिकाची लागवड केल्यास पाणी व्यवस्थापनेमध्ये अडचणी येऊ शकतात, म्हणून जमिनीची निवड योग्य पद्धतीने होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
दिवसाचे ३० डी. सें.ग्रे. चे वर तापमान गेल्यास फुले व पाते गळण्याचे प्रमाण वाढते.

कापूस पिकाची लागवड :मराठवाड्यामध्ये बागायती कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी. तर कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मान्सूनचा तीन-चार इंच पाऊस पडल्यानंतर करावी. पेरणी योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. त्यामुळे यानंतर पेरणी करु नये. पेरणीस एक आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात एक क्रेिटलपर्यंत घट होऊ शकते.

बागायती शेती साठी खत नियोजन

खत मात्रा                          नत्र            स्फुरद         पालाश
(कि.ग्रॅ.प्रती हेक्टर)              N                  P                K
======================================
एकुण आवश्यक मात्रा      150              75             100
======================================
प्रथम मात्रा                          60               50              25
पेरणीच्या वेळेस

दुसरी खत मात्रा                  30                25              25
पेरणीनंतर 25 दिवसांनी

तीसरी खत मात्रा                   30              00              25
पेरणीनंतर 50 दिवसांनी

चौथी खत मात्रा                     30               00             25
पेरणीनंतर 75 दिवसांनी

♥कोरडवाहु शेती साठी खत नियोजन

खत मात्रा                          नत्र            स्फुरद         पालाश
(कि.ग्रॅ.प्रती हेक्टर)              N                  P                K
=====================================
एकुण आवश्यक मात्रा      120              60             75
=====================================
प्रथम मात्रा                          60               40              25
पेरणीच्या वेळेस

दुसरी खत मात्रा                  30                20             25
पेरणीनंतर 25 दिवसांनी

तीसरी खत मात्रा                   30              00              25
पेरणीनंतर 50 दिवसांनी

♥अधिक उत्पन्न व पिक निरोगी ठेवण्यासाठी बीटी कपाशीला स्फुरद व पालाशयुक्त खत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

♥बोंडे चांगले पोसण्यासाठी 90 ते 120 दिवसांनी,
द्रवखाद 20:20:00
किंवा
द्रवपोषक 13:00:45 ई. पाण्यात विरघळणार्या खतांची 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

♥झिंक, मॅग्नेशिअम आणि बोराॅनची कमतरता भरुन काढण्यासाठी कापसावर आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

♥मॅग्नेशिअम ची कमतरता असल्यास
पेरणीपासुन 45 ते 75 दिवसांनी मॅग्नेशिअम सल्फेट ची फवारणी करावी.

♥झिंक ची कमतरता असल्यास
कमतरतेची लक्षणे दिसुन आल्यास 5 ते 6 दिवसांच्या अंतराने
झिंक सल्फेट ची फवारणी त्वरित करावी.

♥बोराॅन ची कमतरता असल्यास
पेरणीपासुन 60 ते 90 दिवसांनी ( 1  ते 1.5 ग्रम प्रति लीटर पाण्यात)
बोराॅनची ची फवारणी दर आठवड्यास करावी.