अतिवृष्टीच्या तडाख्यात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत हंगाम पुन्हा उभा राहिला. कामे सुरू होऊन थंडीमध्ये वाढ झाल्याने डाऊनीनंतर भुरीचा प्रादुर्भाव दिसून येत असताना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांवर अवकाळीचे संकट आले आहे.
शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन
जिल्ह्यात निफाड, चांदवड, दिंडोरी, नाशिक, येवला, सिन्नर तालुक्यांमध्ये तुरळक प्रमाणात जरी पाऊस झाला असला, तरी द्राक्ष बागांमध्ये तयार होत असलेल्या घडांचे नुकसान होण्याची भीती द्राक्ष उत्पादकांनी बोलून दाखवली आहे. पट्ट्यात पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे. अनेक बागांमध्ये द्राक्ष पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. अशा बागांमध्ये ३० टक्के नुकसान झाले आहे.
मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी
अगोदरच वाढलेली थंडी व धुक्यामुळे डाऊनी व भुरीचा प्रादुर्भाव कायम आहेच. त्यात हा अवकाळी पाऊस द्राक्ष उत्पादकांसाठी बाधक ठरला आहे. झालेल्या पावसामुळे व वातावरण ढगाळ असल्याने बागांवर फवारणी करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांची धावपळ उडाली आहे.
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायला हवा चिकू ! https://t.co/VVJqRnHnb5
— KrushiNama (@krushinama) December 27, 2019
साखरेची विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू https://t.co/ooFY4s8VXz
— KrushiNama (@krushinama) December 27, 2019