विदर्भासह राज्यात आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सध्या आपल्या बागा ताणावर सोडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे आंबिया बहर फोडणाऱ्यांना अडचणीत वाढ झाली आहे. पावसामुळे आंबियाच्या नव्या फुटींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बागेचे पाणी बंद केले जाते.
मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी
त्यानंतर १० ते १५ जानेवारीपासून बागेला पाणी दिले जाते. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात फूलधारणा होण्यास सुरुवात होते. पावसामुळे हे सारे व्यवस्थापन प्रभावित झाल्याने आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
खुशखबर ; विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात
मृगाचे फळ सध्या झाडावर आहेत. मृग बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसामुळे कोणतेच नुकसान नसल्याचे सांगण्यात आले. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी लागेल, अशी माहिती देण्यात आली.
अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांवर संकट https://t.co/aCiJVqNyzY
— KrushiNama (@krushinama) December 27, 2019
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायला हवा चिकू ! https://t.co/VVJqRnHnb5
— KrushiNama (@krushinama) December 27, 2019