Curd And Sugar | दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Curd and Sugar | टीम कृषिनामा: दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण दह्यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळून येतात. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन बी 12 इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर दही खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि पचनक्रियाही निरोगी राहते. मात्र, दह्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने वजन झपाट्यात वाढते. अनेकांना दह्यामध्ये साखर मिसळून खायला आवडते. पण तुम्हाला माहित आहे का? दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने शरीराला काही दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने आरोग्याला पुढील दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

डायबिटीज (Diabetes-Disadvantage of Curd and Sugar)

दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने डायबिटीसचा धोका वाढू शकतो. कारण साखर डायबिटीसच्या रुग्णांसाठी खूप हानिकारक असते. नियमित दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने टाईप 2 डायबिटीसचा धोका अधिक निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल, तर तुम्ही दही आणि साखर यांचे सेवन कारणे टाळले पाहिजे.

वजन वाढते (Weight increases-Disadvantage of Curd and Sugar)

नियमित दह्यामध्ये साखर मिसळून त्याचे सेवन केल्याने वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. कारण साखरेमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आढळून येतात, ज्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. त्याचबरोबर दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने लवकर भूक लागते. परिणामी वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

हृदयरोग (Heart disease-Disadvantage of Curd and Sugar)

दह्यासोबत साखर मिसळून खाल्ल्याने हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. कारण साखरेमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आढळून येतात, ज्या ह्रदयावर दाब निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे दही आणि साखर यांचे अति प्रमाणात सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.

डायरिया (Diarrhea-Disadvantage of Curd and Sugar)

दह्यामध्ये जास्त प्रमाणात साखर मिसळून खाल्ल्याने डायरियाची समस्या निर्माण होऊ शकते. कारण साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोट खराब असल्यास दह्यामध्ये साखर मिसळून खाणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर पोट निरोगी ठेवण्यासाठी दही आणि साखरेचे सेवन कमी केले पाहिजे.

टीप: दही आणि साखरेचे माफक प्रमाणात सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. मात्र, याचे अतिसेवन केल्याने आरोग्याला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला कोणताही आजार किंवा एलर्जीचा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांना विचारूनच दही आणि साखरेचे सेवन केले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या

Skin Care With Herbs | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा ‘या’ औषधी वनस्पतींचा वापर

Hormonal Control | हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टीचा समावेश

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करायची असेल तर करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स

Mental Health | मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

Nose Redness | नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल होत असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय