Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करायची असेल तर करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स

Oily Skin | टीम कृषीनामा: आपली त्वचा मऊ, सुंदर आणि चमकदार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेक लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले रसायनयुक्त उत्पादने वापरतात. पण या उत्पादनामुळे त्वचेला हानी पोहोचवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतींचा वापर केला पाहिजे. या पद्धतींचा वापर केल्यावर त्वचा चमकदार आणि निरोगी राहू शकते. त्याचबरोबर या टिप्स फॉलो केल्यावर त्वचेवरील पिंपल्स, तेलकटपणा इत्यादी समस्या देखील दूर होऊ शकतात. त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही पुढील आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करू शकतात.

चंदन (Sandalwood-For Oily Skin)

तेलकट त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी चंदन फायदेशीर ठरू शकते. चंदनामध्ये आढळणारे घटक त्वचेवरील पिंपल्स, पुरळ आणि तेलकटपणा दूर करू शकतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही थेट चेहऱ्यावर चंदन लावू शकतात. चंदनाच्या मदतीने त्वचा हायड्रेट राहू शकते. त्याचबरोबर चंदनाचा वापर केल्याने त्वचा थंड राहण्यास मदत होते.

कोरफड (Aloevera-For Oily Skin)

कोरफड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर कोरफडीमध्ये आढळणारे घटक आपल्या त्वचेसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. कोरफडीमध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यास मदत करतात. कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्याने तेलकटपणा तर दूर होतोच पण त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग देखील कमी होऊ शकतात.

कडुलिंबाची पाने (Neem leaves-For Oily Skin)

कडीलिंबू एक आयुर्वेदिक वनस्पती आहे, ज्यामध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरू शकतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कडुलिंबाची पेस्ट चेहऱ्याला लावू शकतात. कडुलिंबाच्या मदतीने डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर याच्या नियमित वापराने त्वचेचा रंग सुधारू शकतो.

चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही वरील आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

कोरफड आणि लिंबाचा रस (Aloevera and lemon juice-For Dark Spots)

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कोरफड आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला कोरफडीच्या गरामध्ये लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. दहा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. लिंबामध्ये आढळणारे सायट्रिक ऍसिड त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी कोरफड आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो.

कोरफड आणि मुलतानी माती (Aloevera and Multani soil-For Dark Spots)

त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कोरफड आणि मुलतानी माती फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी मातीमध्ये आवश्यकतेनुसार कोरफडीचा गर आणि गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा निघून जाण्यास मदत होते.

कोरफड आणि कडुलिंबाची पाने (Aloevera and neem leaves-For Dark Spots)

चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी कोरफड आणि कडुलिंबाची पेस्ट उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला कोरफडीच्या गरामध्ये कडुलिंबाच्या पानांची पेस्ट मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Mental Health | मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

Nose Redness | नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल होत असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Mahashivratri 2023 | महाशिवरात्रीला उपवास करणार असाल, तर करा ‘या’ टिप्स फॉलो

Potato Juice | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Weight Loss | शरीरातील अतिरिक्त चरबी पासून सुटका मिळवण्यासाठी जिरा पाण्याचे ‘या’ पद्धतीने करा सेवन