शेततळे व त्याचे फायदे

शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते.

शेततळे तयार करणे

 • शेतजमिनीतील मोक्याच्या जागेची निवड करून चारही बाजूने खणावे. शेततळे किमान १ ते १.५ मीटर खोल असावे.
 • या खड्ड्याच्या आतील बाजूने प्लास्टिक पेपर अंथरावा. (याला लायनिंग असे म्हणतात).
 • हा प्लास्टिक पेपर साधारण १०० मायक्रोन आणि ४०० ते १००० गेज चा असावा.
 • शेत तळ्याच्या बाजूच्या भिंतींचा कोन साधारण ४५ अंश च्या जवळ असणे महत्वाचे असते.

शेततळे तयार करताना घायव्याची काळजी

 • शेततळे तयार करताना ज्या जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण कमी आहे, अशा जागेची निवड करावी.
 • शेततळ्याचे आकारमान निश्चित करण्यासाठी प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा निश्चित करावी.
 • चाचणी खड्डे घेऊन शेततळ्याची खोली निश्चिेत करावी.
 • शेततळ्यात ज्या क्षेत्रातून पाणी येणार आहे, ते पाणलोट क्षेत्र निश्चित करून त्याचे क्षेत्र मोजावे.
 • शेतातील पाण्याचा प्रवाह निश्चित करावा.
 • शेततळ्याचे आकारमान ठरविताना पडणारा पाऊस व त्याची तीव्रता, पाणलोट क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळ्याकरिता उपलब्ध जागा, भिजवावयाचे क्षेत्र व त्यात घ्यावयाची पिके निश्चित करावी.
 • शेततळ्याचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्राच्या दोन ते अडीच टक्यांपेक्षा जास्त नसावे. साधारणतः दोन हेक्टर क्षेत्राकरिता २० X २० X ३ मी. (१२०० घनमीटर) आकारमानाचे शेततळे खोदावे.
 • शेततळे बांधताना माती शेततळ्यात वाहून येणार नाही याची काळजी घ्यावी.
 • ज्या ठिकाणी शेततळे बांधावयाचे आहे तो परीसर शक्यतो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असावा.

फायदे

 • पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.
 • आपत्कालीन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.
 • पूरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
 • चिबड व पाणथळ जमीन सुधारणेसाठी शेततळयाचा चांगला उपयोग होतो.
 • मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग होतो
 • पिकावर औषधे फवारणीसाइी शेतात मुबलक पाणी उपलब्ध होते