मकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी, विरळणी ही कामे करू शकतो. एका मजुराच्या साह्याने हे अवजार चालविता येते.
खत कोळपे ःया अवजारामुळे कोळपणी व खत पेरणी एकाच वेळी एका मजुराच्या साह्याने करता येते. कोळप्यासोबत ६, ९, १२ इंचांची पास दिली असून, पास बदलता येते. खत दोन ओळींच्या बाजूस पडत असल्याने खताची मात्रा वाया जात नाही. एका मजुराची बचत होते.
बैलाच्या साह्याने चालणारा पाच दातेरी मोगडा / पेरणी यंत्र ः या अवजाराचा वापर दुय्यम व आंतरमशागतीसाठी करता येतो. या मोगड्यावर पेरणीच्या संरचना बसवून दोन फणी व तीन फणी पेरणी यंत्रही तयार करता येते. हा मोगडा लाकूड किंवा लोखंडापासून तयार करता येतो. एका दिवसात साधारण एक हेक्टर क्षेत्राची पेरणी, तसेच आंतरमशागत करता येऊ शकते.
तीन फणी मोगडा ः हा मोगडा आंतरमशागतीसाठी कोळप्यासारखा वापरता येतो. पुढे दोन व त्याच्या मधोमध मागे एक असे तीन फण्याचे हे कोळपे असते. फणाचे फाळ त्रिकोणी पात्यांचे असतात, त्यामुळे पिकाच्या दोन रांगांमधील जमीन उकरली जाते. या अवजाराने तण निघतात. लहान सरी- वरंबे तयार होतात; तसेच पिकाच्या बुंध्याजवळ मातीची भर पडते. एका दिवसात साधारण एक हेक्टर क्षेत्राची आंतरमशागत होऊ शकते.
बैलचलित बहुविध कोळपे ः या अवजाराच्या साह्याने पिकांच्या ओळींतील अंतरानुसार पासेची लांबी २२.५ सें. मी.पासून ४५ सें. मी. अंतरापर्यंत ठेवता येते. ओळींतील अंतर ४५ सें. मी.पेक्षा कमी असलेल्या कोणत्याही पिकात हे कोळपे वापरता येते. या कोळप्याच्या साह्याने आपण एका दिवसात २.५ ते तीन एकर क्षेत्रावरील कोळपणी करू शकतो.
– ०२४५२- २२३२३०
कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी