कर्जबाजारीपणाला कंटाळून जालन्यात शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील हस्तपोखरी गावात घडली आहे. सोमनाथ जगनराव गाढे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून ते ४२ वर्षांचे होते. सोमनाथ यांना तीन एकर कोरडवाहू शेती आहे. मात्र सततच्या दुष्काळामुळे घराचा गाडा कसा चालवायचा ही चिंता त्यांना सतावत होती.

त्यातच यंदा मोठ्या मुलीचं लग्न करून दिलं. यासाठी त्यांनी कर्ज काढलं होतं. याचबरोबर सोमनाथ यांच्यावर बँकेचं ९० हजार रुपयांचं कर्जही होतं. यंदाही पावसानं पाठ फिरवल्यानं हे सगळं कर्ज कसं फेडायचं, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. त्यामुळं घराच्या छताला गळफास घेऊन सोमनाथ यांनी आपलं जीवन संपवलं. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि आई-वडील आहेत.

महत्वाच्या बातम्या –

नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाची तीन सदस्यीय समिती नेमून

रावसाहेब दानवे यांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांची घेणार हजेरी