एकाबाजूला शिवसेनेने विमा कंपन्यांविरोधात एल्गार पुकारला आहे तर दुसऱ्या बाजूला देशात २०१८-१९ या वर्षात ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेंतर्गत पाच कोटी एकसष्ट लाख शेतकऱ्यांना विमासंरक्षणाच्या कक्षेत आणल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिली आहे.
विमासंरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी, शेतीचं नुकसान झालेल्या पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्याची रक्कम दिली गेली आहे, अशी माहिती त्यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. देशातल्या पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी किमान पन्नास टक्के क्षेत्रापर्यंत विमा संरक्षणाची व्याप्ती वाढवण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचंही तोमर यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या –
डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50 हजार
‘एकीकडे दादांचं ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ, तर दुसरीकडे गडकरी म्हणतात टोल भरा’