मराठवाड्यातील एकूण ४२१ मंडळांपैकी अपवाद वगळता अपेक्षीत पाऊस बहुतांश मंडळात झाला नाही. दुसरीकडे ८५ मंडळात अपेक्षीत पाऊस तर सोडा १०० मिलिमिटरही एकूण पाऊस आजपर्यंत पडला नाही. त्यामुळे पाऊस येईल या आशेवर पेरणी केलेली पीक, आता मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
त्यामुळे गेल्यावर्षीचा दुष्काळ संपते न संपते तोच मराठवाड्यातील खरिपावर पुन्हा एकदा संकटाचे ढग गडद होताना दिसत आहेत. जुलै महिना संपत आला तरी पावसाचा खंड वाढतच असल्याने जिल्ह्यातील पिके करपली आहेत. त्यातच कापूस, सोयाबीन पिकांच्या पेरणीचा कालावधीही उलटून गेल्याने जिल्ह्यातील ९० टक्के शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. पिकाच्या बाबतीत अशी परिस्थिती विदर्भातील अन्य जिल्ह्यांतही दिसून येत असल्याने एकूणच शेतकरी हवालदिल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
राज ठाकरेंकडून काय शिकायला मिळालं? , आदित्य ठाकरे म्हणतात ….
मध्य महाराष्ट्रासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज