मेथी(शास्त्रीय नाव: Trigonella foenum-graecum, ट्रिगोनेला फीनम-ग्रासम) ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.मेथीला कडवट चव असते.
मेथीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे मेथी ला शहरी भागात चांगली मागणी आहे. हे पाहता शहरालगतच्या भागात मेथीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मेथीची पाने आणि देठ भाजीसाठी तर बियांचा वापर मसाल्यामध्ये आणि लोणच्यात जास्त प्रमाणात केला जातो. मेथीमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वे तसेच प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह पुरेशा प्रमाणात असतात. मेथीमध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत. मेथी हि पाचक असून यकृत व प्लिहा यांची कार्यक्षमता वाढविते. त्यामुळे पंचक्रियेची कार्यक्षमता वाढते.
जमीन :
मेथी ओलिताची सोय असलेल्या जुन्या मुरलेल्या बागायत जमिनीमध्ये उत्तम येते. पाण्याचा निचरा असणारी, मध्यम खोलीची, कसदार जमीन असावी.
हवामान :
मेथी लागवड थंड हवामानात तसेच योग्य सुर्यप्रकाश व हवेत आर्द्रता असताना करणे आवश्यक असते. उन्हाळ्यातदेखील चांगल्याप्रकारे उत्पादन घेता येते.
लागवड :
मेथीचे रान नांगरू नये कारण बी खोल जाऊन उगवण मार खाते. त्यासाठी जमिनीची फणणी करून मशागत करावी. म्हणजे बियांची उगवण होऊन मुळे चांगली जमिनीत रुजतात. कल्पतरू सेंद्रिय खत टाकून सारे ओढावेत. मेथी फोकण्यापुर्वी १ पोत्यास १ लि. जर्मिनेटर + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + ५० ते ६० लि. पाणी या द्रावणामध्ये मेथी बी रात्रभर भिजवून नंतर उपसून सावलीत प्लॅस्टिक कागदावर सुकवावे. नंतर वाफ्यात पेरावे किंवा फोकावे. बी साधारण ४ ते ५ दिवसात कडक उन्हाळा असतानाही उगवून येते. एकरी बियाने ८० किलो लागते. भाजीसाठी मेथी करायची असल्यास लांब सारे पाडणे.
जात :
महराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांकडे नव्या वाणांच्या बियांची लागवड झालेली दिसते. १) कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन), २) पुसा अर्लि बंचिग, ३) मेथी नं. ४७ या प्रकारच्या जाती आढळतात.
कसुरी सिलेक्शन :
या मेथीची पाने लहान, गोलसर असून तिची वाढ सुरुवातीला फारच सावकाश होते. या मेथीची रोपे लहान झुडूपवजा असतात. आणि फांद्या आणि देठ नेहमीच्या मेठीपेक्ष बारीक असतात. या मेथीची फुले आकर्षक पिवळ्या रंगाची, लांब दांड्यावर येणारी असून शेंगा लहान, कोयत्याच्या आकाराच्या आणि बाकदार असतात, तर बिया नेहमीच्या मेथीपेक्षा बारीक असतात. कसुरी मेथी अधिक सुगंधित आणि स्वादिष्ट असते. कसुरी मेठीमध्ये कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन) हा सुधारित वाण भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी विकसित केला असून तो दीड महिन्यात तयार होतो. हा वाण उशीरा तयार होणारा असला तरी त्याचे अनके खुडे घेता येतात आणि हा वाण परसबागेत लावण्यास फार उपयुक्त आहे. बी तयार होण्यास १५० ते १६० दिवस लागतात.
पुसा अर्ली बंचिंग :
हा वाण लवकर वाढतो. या मेथीला भरपूर फांद्या येतात आणि वाढीची सवय उभट असते. या मेथीचे पाने लंबगोल किंवा गोलसर आणि मोठी असतात. या मेथीची फुले पांढरी असून ती शेंड्याकडे पानांच्या बेचक्यातून प्रत्येक ठिकाणी दोन किंवा तीन येतात.
या मेथीच्या शेंगा लांब आणि बी मोठे असते. पुसा अर्ली बंचिंग ही सुधारित जात भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केली आहे. या मेथीची वाढ उभट व लवकर होते. पाने हिरवी असून १२५ दिवसांत बी तयार होते.
मेथी नं. ४७ : महराष्ट्रात मेथी नं. ४७ हा सुधारित वाण विकसित करण्यात आला आहे. याशिवाय बऱ्याच ठिकाणी स्थानिक वाणांची लागवड केली जाते. हिरवी, कोवळी लुसलुशीत पाने, लवकर फुलावर न येणे, कोवळेपणा जास्तीत जास्त टिकून राहणे ही या चांगल्या जातीची काही वैशिष्ट्ये आहेत.
खत नियोजन : बी टाकण्याअगोदर वाफ्यात कल्पतरू खताचा वापर एकरी ४० ते ५० किलो करावा. कल्पतरू खतामुळे जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकून धरला जाते. रासायनिक खते शक्यतो देऊ नयेत.
कीड व रोग : मेथीवर रोग व किडींचा प्रादुर्भाव शक्यतो होत नाही. उन्हाळ्यात पालेभाज्यांचे बाजारभाव वाढलेले असतात. त्यामुळे बाजारभाव मिळण्यासाठी मेथी केली जाते. मात्र उन्हाळ्यातील उष्णतेमुळे मेथीची मर मोठ्या प्रमाणात होते. इतर रासायनिक औषधे वापरून देखील फायदा होत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होते. त्यासाठी बीजप्रक्रियेचेवेळेस जर्मिनेटरचा वापर करून फवारण्या वेळेवर केल्या तर मर अगदी कडक उन्हाळ्यातदेखील होत नाही असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
अधिक, दर्जेदार उत्पादन घेण्याकरिता औषधांच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.
पहिली फवारणी : ( उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लि.पाणी.
दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २२ ते २५ दिवसांनी) : जर्मिनेटर ४०० मिली.+ थ्राईवर ३५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + हार्मोनी १०० मिली. + १५० लि.पाणी.
तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी ) :जर्मिनेटर ५०० मिली. + थ्राईवर ३५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ हार्मोनी १५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १५० लि.पाणी.
काढणी : मेथीची भाजी जातीनुसार ३५ ते ४० दिवसात काढणी योग्य होते. फुलोऱ्यावर येण्याअगोदर भाजीची काढणी करावी. वरीलप्रमाणे फवारणी केल्यास मेथीची पाने रुंद होऊन चमक व तेज येते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. तसेच नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस मेथीची पुर्ण वाढ होऊन काढणीस लवकर येते.
उत्पादन : पावसाळ्यात मेथीच्या १ गुंठ्यात १०० गड्ड्या निघतात. परंतु वरील पद्धतीने लागवड केल्यास ऐन उन्हाळ्यात देखील मेथीच्या १५० ते २०० गड्ड्याचे उत्पादन मिळते. आरोग्यदृष्ट्या मेथी फलदायी असल्याने बाजारपेठेत मेथीला मागणी असते.
महत्वाच्या बातम्या –