शेतकरी चिंतेत; ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर ‘या’ रोगांचा प्रार्दुभाव

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस  पडला. तर हवामान अंदाजनुसार नाशिक जिल्ह्यात ८ जानेवारीला वादळी पाऊस झाला  या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने दणका दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा, कळवण, सटाणा, निफाड, चांदवड, दिंडोरी, तालुक्यांना अवकाळी पावसाने दणका दिला आहे. तसेच डिसेंबर महिन्यापासून शेतकरी (Farmers) मोठ्या अडचणीत आहे, कारण डिसेंबर महिन्याच्या  सुरवातीला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये  जोरदार पाऊस झाला.

मागील महिन्या पासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस,  धुके आणि ढगाळ वातावरणचा फटका शेतीला बसला, या वातावरणमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Farmers) मोठ्या अडचणीत आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली, या  ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे, या  ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर मावा, करपा या रोग्णांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे, त्यामुळे कांद्याच्या पातीचे शेंडे पिवळी पडू लागले आहेत. कांद्याबरोबरच नाशिक जिल्ह्याच्या द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसत आहे.

महत्वाच्या बातम्या –