Mahashivratri 2023 | महाशिवरात्रीला उपवास करणार असाल, तर करा ‘या’ टिप्स फॉलो

Mahashivratri 2023 | टीम कृषीनामा: महाशिवरात्रीचा उपवास शिवभक्तांसाठी खूप खास असतो. दरवर्षी मोठ्या थाटात आणि उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते. यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी बहुतांश लोक उपवास करत असतात. उपवास केल्यानंतर अनेक लोकांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. कारण उपवास सुरू असताना शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता भासायला लागते. त्यामुळे तुम्ही पण जर शिवरात्रीचा उपवास करणार असाल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकतात.

शरीर हायड्रेट ठेवा (Keep the body hydrated-Fasting on Mahashivratri)

उपवासामध्ये शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते. कारण उपवासामध्ये आपण कमी प्रमाणात अन्नाचे सेवन करतो. त्यामुळे शरीरात ऊर्जेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसभरात किमान 8 ग्लास पाण्याचे सेवन केले गेले पाहिजे. मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि अशक्तपणा दूर होतो.

जास्त चहाचे सेवन टाळावे (Avoid drinking too much tea-Fasting on Mahashivratri)

उपवासामध्ये चहाचे अति सेवन करणे टाळले पाहिजे. कारण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस आणि ऍसिडिटीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीराला हानी पोहोचू शकते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी चहाचे सेवन करणे टाळले पाहिजे.

योग्य आहार ग्रहण करा (Consume proper diet-Fasting on Mahashivratri)

उपवास करताना आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. उपवासाच्या दिवशी ज्या गोष्टी सहज पचतात त्याच गोष्टींचे सेवन केले पाहिजे. उपवासात तळलेल्या आणि भाजलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर उपवास सुरू असताना पॅक आणि बाहेरचे अन्न खाणे टाळावे.

उपवास सुरू असताना तुम्ही वरील टिप्स फॉलो करू शकतात. त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचे सेवन करू शकतात.

भाज्या (Vegetables-Mahashivratri Diet)

भाजीपाला हे एक शुद्ध अन्न आहे. त्यामुळे उपवासच्या वेळी भक्तांसाठी हा एक योग्य आहार ठरू शकतो. उपवासामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्यांचे सेवन करू शकत नाही. मात्र, उपवासाच्या दिवशी तुम्ही बटाटा, भोपळा तसेच कॉलोकेशिया या भाज्या खाऊ शकतात. या भाज्या बनवताना तुम्ही त्यामध्ये सैंधव मिठाचा वापर करू शकतात. उपवासाच्या दिवशी या भाज्यांचे सेवन केल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहू शकते.

हेल्दी ज्यूस (Healthy juice-Mahashivratri Diet)

महाशिवरात्रीचा उपवास करणारे भाविक फळांपासून बनवलेल्या रसाचे सेवन करू शकतात. फळांचा रस प्यायल्याने शरीरात अशक्तपणा जाणवत नाही. त्याचबरोबर हेल्दी ज्यूसचे सेवन केल्याने शरीर दिवसभर हायड्रेट राहू शकते. महाशिवरात्रीच्या दिवशी शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही नारळ पाणी किंवा फळांचा रस पिऊ शकतात.

फळ (Fruit-Mahashivratri Diet)

बहुतांश उपवासांमध्ये फळांना विशेष महत्त्व दिले जाते. कारण फळांचे सेवन केल्याने शरीरात उर्जा कायम राहते. त्याचबरोबर फळांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक तत्त्वांचा पुरवठा देखील होतो. उपवासामध्ये तुम्ही सफरचंद, डाळिंब, संत्री, केळी इत्यादी फळांचे सेवन करू शकतात. या फळांचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. त्याचबरोबर या फळांचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Weight Loss | शरीरातील अतिरिक्त चरबी पासून सुटका मिळवण्यासाठी जिरा पाण्याचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Acidity | ऍसिडिटी झाल्यावर लवंगाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Mahashivratri Diet | शरीरात दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी महाशिवरात्रीच्या उपवासात करा ‘या’ गोष्टींचे सेवन

PM Kisan Yojana | सरकारचं ठरलं! शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ तारखेला येणार 13 वा हप्ता

Dry Throat | घसा पुन्हा-पुन्हा कोरडा होत असेल, तर करून बघा ‘हे’ घरगुती उपाय