ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हवी बायोमॅट्रीकची सक्‍ती

गोंदिया : कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसवण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे बायोमॅट्रीक. या बायोमॅट्रीक मुळे उशीर झाला, आलेच नाहीत अश्या गोष्टींची माहिती मिळते. यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसेल आणि कामाचा उरक वाढेल. “तलाठी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकरिता बायोमॅट्रीक अनिवार्य केल्यास ते वेळेत कार्यालयामध्ये हजर राहतील आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या कामांना गती मिळून कामे सुलभ होतील. महाविकास आघाडी सरकारने जनहिताचा हा निर्णय घ्यावा,’’ अशी मागणी सडक अर्जुनी तालुका भाजप युवा मोर्चा प्रभारी तालुकाध्यक्ष हर्ष मोदी यांनी केली आहे.

याचे संदर्भाचे निवेदन गृहमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले. राज्याच्या अनेक गावांमध्ये ग्रामसेवक व तलाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर राहत नाहीत. त्यामुळे गावातील सामान्य जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागतो.

कोणत्याही शासकीय व निमशासकीय योजनेच्या लाभासाठी ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या कागदपत्रांची गरज राहते. परंतु, कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कर्मचारी देखील हजर राहत नाही अथवा सुट्टी घेतात. त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना कागदपत्रांकरिता पायपीट करावी लागते. या सर्व प्रकाराची दखल घेत तलाठी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीकची सक्‍ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

कांदा उत्पादकांसाठी धावले सुजय विखे ; लोकसभेत केली ‘ही’ मागणी

शेतीलिलाव आणि सक्तीची कर्जवसुली थांबवण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे नाशिक जिल्हा बँकेसमोर ठिय्या आंदोलन

कोरडा दुष्काळ घोषित करण्यासाठी दररोज निवेदनांचा पाऊस

हवामान अंदाज : महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, तापमान घटणार