Health Care Tips | हिवाळ्यामध्ये लवंगाचा चहा प्यायल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा आपल्यासोबत येताना अनेक मोसमी आजार घेऊन येतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी (Health Care) ज्यास्त घ्यावी लागते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते त्यामुळे आजारांचा धोका अधिकच वाढतो. अशा परिस्थितीमध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये अनेक बदल करत असतो. त्याचबरोबर या गुलाबी थंडीमध्ये अनेक लोक चहाचे सेवन करत असतात. या चहामध्ये तुम्ही जर लवंगाचा वापर केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आयुर्वेदानुसार लवंग अनेक रोगांवर एक रामबाण उपाय आहे. कारण लवंगांमध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स अँटी एक्सीडेंट आणि अँटी व्हायरल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म आपल्याला सर्दी खोकला ताप आणि मोसमी आजारांपासून दूर ठेवू शकतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये लवंगाचा चहा प्यायल्याने तुम्हाला पुढील आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

लवंगाचा चहा बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका पातेल्यात एक कप  पाणी टाकून गॅसवर गरम करून घ्यावे लागेल. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच लवंग टाकून ते पाणी पाच ते सात मिनिटे उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर ते पाणी गाळून घ्यावे लागेल. या चहाला अधिक चवदार आणि फायदेशीर बनवण्यासाठी तुम्ही या चहा मध्ये एक चमचा मध देखील मिसळून, त्याचे सेवन करू शकतो.

सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय

हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी खोकल्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही जर लवंगाचा चहा प्यायला तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण लवंगांमध्ये मुबलक प्रमाणात अँटि व्हायरस आणि अँटिमाइक्रोबियल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म मौसमी आजारांची लढण्यास मदत करू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात लवंगाचा चहा प्यायल्याने सर्दी खोकला दूर होऊ शकतो.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

हिवाळ्यामध्ये नियमित लवंगाच्या चहाचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. लवंगामध्ये आढळणारे अँटी एक्सीडेंट गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. त्याचबरोबर लवंगाचा चहा रोज पिल्याने रोग आणि संक्रमणापासून सुरक्षा होऊ शकते.

दातदुखीसाठी फायदेशीर

नियमित लवंगाचा चहा प्यायल्याने दातदुखीवर आराम मिळू शकतो. लवंगांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इम्प्लिमेंटरी गुणधर्म आढळतात. जे दातदुखीपासून मुक्त करण्यास मदत करू शकतात. त्याचबरोबर नियमित लवंगाचा चहा प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी देखील कमी होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या