राज्यातील 15 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका; तब्बल 1.36 लाख हेक्टरवर नुकसान

पुणे – डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी (Untimely rain) पावसाने हजेरी लावली. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि विशेषत: द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. हवामानाची अनियमितता, अचानकपणे पडणारा पाऊस यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यात या अवकाळी (Untimely rain) पावसामुळे नुकसान झाले आहे. या राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात या अवकाळी पाऊसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान मोठे झाले आहे. तर यामध्ये राज्यातील कोकण भागातील ५ जिल्ह्यांना तर पश्चिम महाराष्ट्रात ५ जिल्ह्यांना या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले , तर राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांना व  मराठवाड्यातील १ जिल्ह्यात या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.

या अवकाळी  (Untimely rain) पाऊसामुळे राज्यातील 15 जिल्ह्यात तब्बल 1.36 लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. सर्वाधिक नुकसान राज्यातील  सोलापूर जिल्ह्यांत झाले आहे.

हरभरा, मका, ऊस, द्राक्ष, डाळींब  भाजीपाला, कडधान्य, गहू, ज्वारी, या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पाऊसामुळे राज्यातील 15 जिल्ह्यात तब्बल 1.36 लाख हेक्टर  क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई कधी मिळणार याची राज्यातील शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे.

महत्वाच्या बातम्या –