ओमायक्रॉन विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा – छगन भुजबळ

नाशिक – परदेशात ओमायक्रॉन (Omycron) विषाणूचा प्रसार जलद गतीने होतांना दिसत आहे. आपल्या देशातही या विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता त्यावर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक असल्याने या विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर देऊन लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

येवला तालुक्यातील अंदरसूल व निफाड तालुक्यातील कानळद येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर, मुंबई बाजार समितीचे संचालक तथा लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, अंदरसुलच्या सरपंच सविता जगताप, कानळदचे सरपंच शांताराम जाधव, प्रांताधिकारी सोपान कासार, सार्वजनिक बांधकाम‍ विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे व सागर चौधरी, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, येवला गटविकास अधिकारी शफिक अहमद शेख, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना साथरोगाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजन व औषधांच्या साठ्याबाबत स्वयंपूर्ण व सुसज्ज आहे. नागरिकांनी कोरोना सोबतच ओमायक्रॉन विषाणूचा सामना करण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. देशाचे अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर येत असून जनजीवन सुरळीत होत आहे. कोरोना काळात थांबलेल्या विकास

कामे पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

कोरोना काळात नागरिकांना अन्न धान्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यात आला असून शासनामार्फत राज्यातील गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ देण्यात आला आहे. तसेच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे दीड ते दोन वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा हा शैक्षणिक प्रवास नियमितपणे सुरू राहण्यासाठी शिक्षकांनी व पालकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या पाल्यांची योग्यती खबरदारी घ्यावी, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

अंदरसुल येथील या कामांचे झाले भूमिपूजन

येवला विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते व सामाजिक सभागृह अशा एकूण 12 विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज पार पडले. त्यामध्ये येवला तालुक्यातील 15 कोटी 84 लक्ष रुपयांची 6 कामे तसेच निफाड तालुक्यातील 6 कोटी 48 लक्ष 50 रुपयांची 6 अशी एकूण 20 कोटी 82 लक्ष रुपयांच्या 12 विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. येवला तालुक्यातील राज्यमार्ग 10 ते 25 रस्ता ते रेल्वे स्टेशन या मार्गाचे मजबुती व डांबरीकरण (अंदाजित किंमत 2.63 कोटी), येवला, नागाडे, धामणगाव, भारम, वाघाळे ते औरंगाबाद हद्द रस्त्याचे (अंदाजित किंमत 2.10 कोटी) मजबुती व डांबरीकरण या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

येवला तालुक्यातील अनकाई, कुसमाडी, नगरसुल, अंदरसुल ते पिंपळगांव जलाल प्रमुख जिल्हा मार्गाची सुधारणा करणे (अंदाजित किंमत 3.00 कोटी), मातुलठाण, धामणगाव अंदरसुल ते प्रमुख जिल्हा मार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (अंदाजित किंमत 5.00 कोटी), अनकाई, कुसमाडी, नगरसुल, अंदरसुल ते पिंपळगांव जलाल प्रमुख जिल्हा मार्गाची सुधारणा करणे (अंदाजित किंमत 03.00 कोटी), अंदरसूल येथील विरोबा मंदिरा समोर तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत सामाजिक सभागृह बांधणे (रुपये 11 लक्ष) इत्यादी कामांचे यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्य हस्ते भूमिपूजन  करण्यात आले.

कानळद येथील या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

निफाड तालुक्यातील एकूण 4 कोटी 48 लक्ष 50 हजार रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले. निफाड तालुक्यातील कानळद येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन (अंदाजित किंमत 8.50 लक्ष), निफाड तालुक्यातील कानळद येथे मुलभूत सुविधा अंतर्गत अनुसूचित जाती वस्ती गावांतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण करणे (अंदाजित किंमत 10.00 लक्ष), कानळद याठिकाणी मुलभूत सुविधांतंर्गत मारुती मंदिर परिसर कॉक्रिटीकरण करणे

(अंदाजित किंमत 10.00 लक्ष) तसेच आमदार निधीतुन कानळद येथील सभामंडप बांधणे (अंदाजित किंमत 10.00 लक्ष) व मुलभूत सुविधा अंतर्गत कानळद येथील नविन स्मशानभूमीचे भूमिपूजन  (अंदाजित किंमत 10.00 लक्ष) इत्यादी कामांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन  करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –