अनेकदा आपण उगीच चिडचिड करतो. त्या वेळी लक्षात येत नाही, पण थोड्या वेळाने आपलं आपल्याला उमगतं आणि आणखी निराश व्हायला होतं. कधी काही कारण नसताना उदास वाटतं. ही समस्या वारंवार होत असेल तर तुम्हाला झोपेच्या वेळेकडे लक्ष द्यावं लागेल. दररोज तुम्ही किती तास सलग झोप घेता? पाच- सहा तासापेक्षा ही वेळ कमी असेल तर वेळीच सावध व्हा.
नव्या वर्षासाठी SBI ने ग्राहकांसाठी आणली एक खास ऑफर
जेव्हा तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित नसते तेव्हा अनेकदा मानसिक त्रास सुरू होतात. मूड स्विंग आणि निद्रानाश यांचा घनिष्ठ संबंध आहे.अनेक दिवस जर तुम्हाला वेळेत झोप येत नसेल तर तुम्हाला आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. हृदयविकार आणि मधुमेहासारखे गंभीर आजार निद्रानाशमुळे होऊ शकतात. झोप न येण्याने किंवा कमी झोपल्यामुळे स्वभाव चिडचिडा होतो.
जाणून घ्या, काय आहेत कापराचे घरगुती फायदे…
15 टक्के लोक नैराश्यात वेगळ्या पद्धतीने वागताना दिसतात. नैराश्यात काहींना झोप येत नाही तर 15 टक्के लोक असेही आहेत जे तणावात किंवा नैराश्यात असताना गरजेपेक्षा जास्त झोपतात.जर तुम्हाला कधी जाणवलं की तुमचं शरीर आधीपेक्षा जास्त संवेदनशील होत आहे तर तातडीने तुमच्या झोपण्याच्या सवयींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. कोणत्याही कारणामुळे तुम्हाला शांत आणि पूर्ण झोप मिळत नसेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. याचमुळे निद्रानाशमुळे सर्वसामान्यपणे शरीर फार संवेदनशील होऊन जाते.
स्वयंपाकघरातील छोट्याश्या वेलचीचे गुणकारी फायदे माहित आहेत का? https://t.co/h0hvOnbDzT
— KrushiNama (@krushinama) December 28, 2019
इंटरनेट बंद झाले तर ‘असे’ वापरा जीमेल, गुगल मॅप आणि यूट्यूब https://t.co/iHoEvFaZEt
— KrushiNama (@krushinama) December 28, 2019