मोड आलेल्या धान्याचे महत्व:
मानवाचे शरीर हे आम्लरीयुक्त असून त्राचे कार्र आम्लयुक्त आहे. आपण आहारात जास्तीत जास्त आम्लयुक्त आहार घेत असतो परंतु मोड आलेली कडधान्य ही आम्लारीयुक्त असतात त्यामुळे शरीरातील चयापचयाची प्रक्रीया व्यवस्थित चालण्यासाठी शरीरातील जास्त तयार होणाऱ्या आम्लावर नियंत्रण ठेवायचे काम ते करत असतात. मोड आलेल्या धान्य हे इन्झाइम्स अॅन्टी-ऑक्सीडन्टस, क्षार, जिवनसत्व, प्रथिने इ. यांचे माहेरघर आहे.
- इन्झाइम्स:
मोड आलेल्रा धान्रामध्रे प्रचंड प्रमाणात इन्झाइम्स असतात ही इन्झाइम्स, क्षार, जिवनसत्व, प्रथिने व इतर दुर्मिळ घटकांचे पचनासाठी महत्वाची भुमिका बजावत असतात. मोड आलेल्या धान्यामध्ये फळे व भाजीपाला यापेक्षा 100 पट जास्त प्रमाणात इन्झाइम्सचे प्रमाण असते. जर आपण अन्न 47 डीग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त गरम केल्यास यातील इन्झाइम्स नष्ट होतात यामुळे मोड आलेली धान्य कच्ची खावयची असतात. - अॅन्टीऑक्सीडन्टस:
या धान्यामध्ये प्रकारची अॅन्टीऑक्सीडन्टस भरपुर प्रमाणात असलेने शरीरातील चयापचयाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते. अॅन्टीऑक्सीडन्टसमुळे शरीरातील चयापचयाच्या प्रक्रियेत निर्माण होणारी टॉक्सीन्स ही निष्प्रभ होण्यास मदत होते त्यामुळे किडणी व यकृतावरील ताण कमी होतो. - क्षार:
मोड आलेल्या धान्यात निरमीत क्षारांचे रूपांतर चिलेटेड क्षारांमध्ये होत असलेने त्यांचे शरीरात शोषण चांगले पध्दतीने होते. तसेच काही क्षार हे प्रोटीन बरोबर बांधले जातात त्यामुळेही त्यांची उपलब्धता वाढते. क्षार हे शरीरातील विविध गरजांसाठी आवश्यक असतात. - प्राथिने:
मोड आलेल्या धान्यात प्रथिनांची उपलब्धता वाढते. या पध्दतीमुळे आवश्यक असणाऱ्या अमीनो आम्लांचे प्रमाण वाढते. हे महत्वाचे घटक शरीरात शोषले जातात. - जिवनसत्व:
मोड आलेल्या धान्यात जिवनसत्वाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये प्रामुख्याने जिवनसत्व अ, ब, क यांचे प्रमाण 200 ते 600 टक्केंनी वाढते. जिवनसत्वांच्या भरपुर उपलब्धतेमुळे वेगवेगळया प्रकारच्या आजारांवर नियंत्रण करता येते. याबाबत विदेशात बराच अभ्यास झालेला आहे. उदा. साध्या मुगापेक्षा मोड आलेल्या मुगामध्ये वाढलेल्या घटकांचे प्रमाण.
अन्नघटक प्रमाण:
- ऊर्जा- 15 टक्के कमी
- प्रथिने- 30 टक्के जास्त
- कॅल्शिअम- 34 टक्के जास्त
- पोटॅशिअम- 80 टक्के जास्त
- सोडीअम- 690 टक्के जास्त
- आयर्न- 40 टक्के जास्त
- फॉस्फरस- 56 टक्के जास्त
- जिवनसत्व अ- 285 टक्के जास्त
- जिवनसत्व ब 1- 208 टक्के जास्त
- जिवनसत्व ब 2- 515 टक्के जास्त
- जिवनसत्व ब 3- 256 टक्के जास्त
- जिवनसत्व क- बरेच जास्त