अहमदनगरमध्ये कांदा साडेपाच हजारांवर स्थिर

गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले कांद्याचे दर गेल्या आठवडाभरापासून बऱ्यापैकी खाली आले आहेत. सध्या नगरसह अन्य बाजार समित्यांत कांद्याचे दर ५०० रुपयांपासून सुरू होत असून, साडेपाच हजारांवर स्थिर आहेत. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस लिलाव होत असतात.

नगर जिल्ह्यामधील बहुतांश बाजार समितीत गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर कमालीचे वाढले होते. घोडेगाव बाजार समितीत सर्वाधिक २१ हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. नगरसह अन्य बाजार समितीतही वीस हजारांपर्यंत दर गेले होते. गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले कांद्याचे दर गेल्या आठवडाभरापासून बऱ्यापैकी खाली आले आहेत. बहुतांश बाजार समितीत बाजार समित्याच कांद्याचे दर ५०० रुपयांपासून सुरू होत असून, पाच हजारावर स्थिर आहेत. शनिवारी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये ७५ हजार ७८७ गोण्याची आवक झाली.

एक नंबर कांद्याला ४६०० ते ५५००, दोन नंबरच्या कांद्याला ३६०० ते ४५००, तीन नंबरच्या कांद्याला १६०० ते ३५०० व चार नंबरच्या कांद्याला ५०० ते १५०० रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला, असे नगर बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी कांद्याचे लिलाव होत असतात.