नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ९५६ शेतकऱ्यांकडून ४ हजार ५९३ क्विंटल मूग खरेदी किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या तीन जिल्ह्यांतील ४५९ शेतकऱ्यांना १ कोटी ११ लाख ९९ हजार २४० रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अजून एकूण ४९७ शेतकऱ्यांचे २ कोटी ११ लाख ८१ हजार ४१० रुपये रकमेचे चुकारे येणेबाकी आहेत.
हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन या शेतमालाच्या खरेदीसाठी यावर्षीच्या हंगामात अनेकदा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी फारसा प्रतिसाद दिला नाही. नांदेड जिल्ह्यात जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयअंतर्गत नाफेडच्या नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, किनवट या केंद्रांवर मिळून एकूण ४५९ शेतकऱ्यांनी आणि विदर्भ को-मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ४२ शेतकऱ्यांनी अशी एकूण ५१० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. फक्त मुखेड येथील केंद्रावर २९ शेतकऱ्यांचा १२५ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला. उडिद, सोयाबीनची खरेदी निरंक आहे.
हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार येथील केंद्रांवर २७६ शेतकऱ्यांच्या ७७७.५० क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली. डिसेंबरअखेर पर्यंत या तीन जिल्ह्यातील ८६६ शेतकऱ्यांच्या ४ हजार ५९३ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली. हमीभावानुसार या मुगाची किंमत ३ कोटी २३ लाख ८० हजार ६५० रुपये एवढी होती. आजवर या तीन जिल्ह्यांतील एकूण ४५९ शेतकऱ्यांच्या १ कोटी ११ लाख ९९ हजार २४० रुपयांचे चुकारे अदा केले आहेत.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला गती येईल https://t.co/24IkWaPEby
— KrushiNama (@krushinama) January 6, 2020
मध आणि मनुके आरोग्यास लाभदायक https://t.co/6wcCpD5Fv9
— KrushiNama (@krushinama) January 6, 2020