मुंबई – जगभरात कोरोनाच्या (corona ) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे५७८ रुग्ण आढळून आले आहेत.
तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (corona ) 6 हजार 531 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे (corona ) ३१५ लोकांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 75 हजार 841 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात तब्बल 4 लाख 79 हजार 997 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तर देशात गेल्या २४ तासात 7141 कोरोनारुग्ण कोरोनमुक्त झाले आहे, तर देशात आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 37 हजार 795 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ भागात आज मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यात ओमायक्रॉनचा कहर; गेल्या २४ तासात इतक्या रुग्णांची नोंद
- जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकोप्याने काम करा – अजित पवार
- ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल – राजेश टोपे
- हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा, जाणून घ्या
- हिवाळ्यात अंडे का खावे? जाणून घ्या काय आहेत फायदे…..