- अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.
- अंड हा प्रोटिन्स मिळवण्याचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. अंड्यामधून भरपूर प्रोटिन्सचा पुरवठा होत असल्याने स्नायू बळकट होतात व उतींचे कार्य सुधारून शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अंड्यामुळे पुरुषांची ११% तर स्त्रियांची १४% प्रोटिन्सची गरज भागते. एका अंड्यामधून ६ ग्रॅम प्रोटिन्स मिळतात.
- आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळतात.
- अंड्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि सातत्याने खाण्यावर नियंत्रण येते. त्यामुळे जास्त कॅलरीज निर्माण होत नाहीत तर त्या वापरल्या जातात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या –
पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी – शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे
मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत ; पेरणी केलेली पिके करपली
मासे साठविण्यासाठी १० हजार शीतपेट्या उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रशासनाचे दुर्लक्ष ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात