थंडीच्या दिवसांत गूळ खाणे सर्वाना आवडते. कारण गुळात गर्मी जास्त असते. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तसेच गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठय़ातला मोठा आजारही बरा होऊ शकतो.
पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं. रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते. जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते. घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खल्ल्याने आराम मिळतो.
याच प्रमाणे गुळात कुठल्याही अॅलर्जी विरुद्ध लढणारी तत्त्वे असतात. दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो. गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात.
दरम्यान, दूध व गुळाच्या सेवनामुळे सांध्यांचे दुखणेदेखील कमी होण्यास मदत होते. कारण दुधात व्हिटॅमिन डी व कॅल्शिअम आणि गुळातील लोहामुळे सांधे मजबूत होतात. गुळाच्या अति खाण्यामुळे मात्र रक्त दूषित होऊन अंगावर फोड येण्याचा धोका असतो. म्हणून ज्यांना त्वचेचे रोग असतील त्यांनी गूळ खाऊ नये.
महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या; पाणी कसं आणि केव्हा प्यावं?
कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…
कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु