कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…

कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खान आहे. कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कच्चा कांदा खाण्याचे फायदे…

  • कांद्याचा रस पिणे किंवा त्याने तळवांना मालिश करणे खूप फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्याने केस लांबसडक होण्यास मदत होते. त्याचबरोबर कांद्याचा रस स्कॉल्फला लावा आणि तासाभरानंतर कोमट पाण्याने केस धुवा.
  •  काद्यांतील पोषकतत्त्व कन्सर सारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करतात. त्याचबरोबर त्वचा विकार दूर होण्यास मदत होते.
  • रक्तदाब असणाऱ्यांसाठी कांदा एक वरदान आहे. यामुळे बीपी नियंत्रित राहतो. त्यामुळे जेवताना कच्चा कांदा जरुर खा.
  • कच्चा कांद्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
  • स्टोन असणाऱ्यांसाठी कांद्याचे सेवन फायदेशीर ठरते. त्यासाठी रोज रिकाम्या पोटी कांद्याचा रस घ्या.
  • केसगळती ही आजकालची सामान्य समस्या आहे. पण याचा उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. कच्चा कांद्याचा रस केसांना लावल्यास केसगळती दूर होते.
  • कांद्यात फास्फोरिक अ‍ॅसिड असते. त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. नसांचे दुखणे असल्यास दुखत असलेल्या ठिकाणी कांद्याच्या रसाने मालिश करा. असे महिनाभर केल्याने ही समस्या दूर होण्यास मदत होईल.