कारली पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान

कारली आणि दोडकी या दोन्ही पिकांची पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवड करतात. कारल्यास उष्ण व दमट हवामान तर दोडक्यास समशितोष्ण व दमट हवामान मानवते. दोडका थोडीशी थंडी सहन करु शकतो. मात्र कार्लाच्या वेलीवर थंडीचा परिणाम होतो.

भुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्यम जमनीत लागवड करावी. चोपण अथवा चिबड जमिनीत ही पिके घेऊ नयेत.जमीनीची उभी आडवी नांगरट करून तणांचे व गवतांचे तुकडे वेचून शेत स्वच्छ करावे.

तर नंतर प्रति हेक्टरी 100 ते 150 क्विंटल शेणखत किंवा कंपोस्टखत टाकावे. कुळवणी करून खत जमिनीत चांगले मिसळावे. कार्ल्याची लागवडीसाठी दोन ओळीत 1.5 ते 2 मिटर व दोन वेलीत 60 सेमी अंतर ठेवावे. दोडक्यासाठी दोन ओळी 2.5 ते 3.5 मिटर वर दोन वेलीत 80 ते 120 सेमी अंतर ठेवतात. प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 बिया लावतात. दोन्ही पिकात बियांची टोकन ओलसर जमिनीत करावीत. बिया वरंब्याच्या बगलेत टोकाव्यात. उगवण होईपर्यंत पाणी बेताचे द्यावे.

कार्लाची लागवड उन्हाळी पिकासाठी जानेवारी फेब्रूवारी महिन्यात करतात. उशिरात उशिरा मार्चमध्ये सुध्दा लागवड करतात. खरीपाची लागवड जून जूलै महिन्यात करतात. दोडका कमी दिवसात येणारा असल्यामुळे त्याची लागवड कारल्यापेक्षा 15 ते 20 दिवसांनी उशिरा केली तरी चालते.

महत्वाच्या बातम्या –

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय ; मराठवाड्यतील शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत अतिवृष्टी – हवामान खाते

भरघोस उत्पादन देणाऱ्या मिरची लागवडीचे जाणुन घ्या तंत्रज्ञान

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काजू आहेत फायदेशीर ; जाणून घ्या काय आहेत फायदे