प्रशासनाचे दुर्लक्ष ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात

जिल्ह्यात पडलेल्या सततच्या पावसामुळे शेळ्या-मेंढ्यांना फुटरोट या विषाणूजन्य रोगाची लागण झाली आहे. यामुळे मेंढपाळाच्या कळपातील अनेक शेळ्यामेंढ्या यापासून बाधित झाल्या आहेत. तसेच नीरा परिसरातील राख, नावळी, गुळूंचे, कर्नलवाडी, पिसुर्टी आदी भागातील मेंढपाळांच्या मेंढ्या ह्या तर मृत्युमुखी पडल्या आहेत. काही मेंढपाळ्याना आपली जनावरे ही कवडीमोल भावाने विकावी लागली आहेत. जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली खूप दिवस लांबलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यासोबतच अनेक ठिकाणी शेती वाहून गेली.

पण फक्तशेतीचेच नव्हे तर त्यासोबत शेतकऱ्यांचे पशुधन ही धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे येथील मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आजारामध्ये जनावरांच्या पायांना जखमा होतात. या जखमा सतत वाढत गेल्यास जनावरांना चालता येत नाही. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्यावर परिणाम होतो. पर्यायाने आजार बळावर गेल्यास उपासमार होउन अशी जनावरे मृत्युमुखी पडतात.

शासनाने एकाधे लक्ष दिले पाहिजे. शासनाच्या वतीने या काळात खबरदारी घेऊन लोकांचे नुकसान होऊ नये, म्हणून त्यांनी नवीन उपाययोजना करणे गरजेचे असते. पण इथे तर चित्रच वेगळे आहे. मेंढपाळांना याबाबत काहीच माहिती नसल्याने ते मेडिकलमधून औषध आणून स्वत:च उपचार करतात.

मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. या आजारामुळे अनेकांना आपल्या कळपातील दहा ते वीस बकरी गमवावी लागली. याबाबत पोलीस पाटील दीपक जाधव यांनी पशुवैद्यकीय विभागाची संपर्क साधून उपाययोजना करण्याचे कळवले. यानंतर गुळूंचे येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी धनगरपाड्यावर जाऊन पाहणी केली. लाळ किंवा खुरवंत रोग नसून तो एक संसर्गजन्य आजार असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य उपचार घेतल्यास हा आजार लगेच बरा होतो, असे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या, काय आहेत गाजराचे फायदे….

पीक कापणी प्रयोगातल्या त्रुटींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई – सहकार मंत्री

पालकमंत्री केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व मच्छिमारांच्या नुकसानीची मंत्रिमंडळात मांडली वस्तुस्थिती

शेतकऱ्यांसमोर नवीन संकट ; आता वेबसाइटवरूनच विमा पावत्या ‘डिलीट’ !