मेथी : (शास्त्रीय नाव: Trigonella foenum-graecum, ट्रिगोनेला फीनम-ग्रासम) ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.मेथीला कडवट चव असते. जाणून घेऊयात काय आहेत मेथी खाण्याचे फायदे…..
- मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते-
काही संशोधनात असे आढळून आले आहे की मेथीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.मेथीमध्ये असलेल्या स्टेरॉईडल सेपोनिन्समुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईड चे शोषण टाळले जाते.
- ह्रदयविकाराचा धोका कमी होतो-
मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या घटकामुळे ह्रदयाचे आरोग्य नियंत्रित राहते. त्याचप्रमाणे मेथीमध्ये असलेल्या पोटॅशियमुळे सोडीयमच्या कार्यावर नियंत्रित राहते ज्यामुळे हुदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतात.
- रक्तातील साखर नियंत्रित राहते-
मधूमेहींनी मेथाचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते. तसेच मेथीमधील अमिनो असिड या घटकामुळे इन्शूलीनच्या निर्मितीस देखील चालना मिळते.
- पचनप्रक्रिया सुलभ होते-
मेथीमध्ये फायबर व अन्टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात व पचनास मदत होते.कधीकधी अपचन अथवा पोटदुखी असल्यास मेथीचा चहा घेतल्यास आराम मिळतो. सकाळी उठल्यावर मेथीचा उकळलेला अर्क घेतल्यास बद्धकोष्ठतेमध्ये देखील फायदा होतो.
- छातीत जळजळ होत असल्यास आराम मिळतो-
छातीत जळजळ होत असल्यास रोजच्या आहारात एक चमचा मेथी दाण्याचा समावेश करा. यासाठी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवा व नंतर स्वयंपाकामध्ये वापरा.
- वजन कमी करण्यासाठी मेथीचा चांगला उपयोग होतो-
वजन कमी करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले मेथीचे दाणे सकाळी उपाशी पोटी चाऊन खा. मेथीमध्ये असलेल्या नैसर्गिक फायबरमुळे ते दाणे पोटात फुगतात भूक कमी लागते. ज्यामुळे सहाजिकच तुम्हाला वजन कमी करण्याचे ध्येय लवकर गाठता येते.
- ताप व घसा खवखवणे यावर गुणकारी-
ताप असल्यास मेथी एक चमचा लिंबू व मधासोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो. तसेच खोकला व घसा खवखवत असल्यास त्यावर देखील मेथी गुणकारी आहे.
- स्तनपान करणा-या महिलांमध्ये दुधाचे प्रमाण वाढते-
मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन या घटकामुळे आईच्या दूधाच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे स्तनपान करणा-या महिलांना मेथी खाण्याचा सल्ला देण्यात येतो.
- बाळाचा जन्म सुलभ होतो-
मेथीच्या सेवनामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी गर्भाशयाच्या आकुंचन व प्रसरणाला मदत होते. त्यामुळे प्रसव वेदना कमी होतात.मात्र अधिक प्रमाणात मेथी सेवन केल्यास गर्भपात होण्याचा धोका असल्यामुळे गर्भवती महीलांनी मेथीचे सेवन करताना सावध रहावे.
- महिलांच्या मासिक पाळीमधील समस्या कमी होतात-
मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन,आयसॉफ्लॅवेन्स,अॅस्टोजिन या घटकांमुळे मासिक पाळीमध्ये आराम मिळतो. त्याचप्रमाणे मेथीमधील या घटकांमुळे मॅनोपॉजमध्ये होणा-या मूड बदलणे व उष्णतेच्या समस्येमध्ये देखील आराम मिळतो. मासिक पाळीच्या काळामध्ये तसेच गरोदर व स्तनपान करणा-या महिलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होते. आहारात मेथीच्या भाजीचा वापर केल्याने शरीराला पुरेसे लोह मिळते. मात्र या भाजीतील लोहाचे शरीरात शोषण होण्यासाठी त्यामध्ये टोमॅटो व बटाट्याचा वापर देखील करा.
- कोलन कॅन्सर टाळता येतो-
मेथीमधील फायबर या घटकांमुळे अन्नातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे कोलन ,कॅन्सर टाळण्यास मदत होते.
- त्वचेचा दाह अथवा चट्टे कमी होतात-
मेथीमधील विटामिन-सी या अॅन्टीऑक्सिडंटमुळे त्वचा भाजणे,गळू अथवा इसबामध्ये होणारा त्वचेचा दाह कमी होतो. तसेच जखमा लवकर भरुन निघतात.यासाठी भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांची पेस्ट जखमेवर लाऊन त्यावर स्वच्छ कापडाची पट्टी बांधा.
- त्वचा विकार कमी होतात-
चेह-यावरील ब्लॅकहेड्स,पिम्पल्स,सुरकुत्या कमी करण्यासाठी मेथीचा फेसपॅक लावल्यास चांगला फायदा होतो. यासाठी मेथीचे दाणे उकळलेल्या पाण्याने चेहरा धुवा अथवा ताज्या मेथीच्या पानांची पेस्ट वीस मिनिटे चेह-यावर लावा व नंतर चेहरा स्वच्छ धुवा.
- केसांच्या समस्या कमी होतात-
मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात. केस गळत असल्यास अथवा पातळ असल्यास दररोज तुमच्या कोकनट ऑईलमध्ये मथी दाणे रात्रभर भिजत ठेवा व नंतर केसांना त्याचा हलक्या हाताने मसाज करा. मेथींमुळे केसांमधील कोंडा देखील कमी होतो.
महत्वाच्या बातम्या –
पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी अडीच फुटांनी कमी
जाणून घ्या ; कशी करावी मेथीची लागवड
जाणून घ्या काय आहेत डाळिंब खाण्याचे फायदे…
बजेटच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव घसरले…