सोलापूर – राज्यातील साखर उत्पादनात (Sugar production) मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर कारखाने (Sugar factory) सुरू झाले आहे, राज्यात मागच्या वर्षी १९० साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यात यंदा तब्बल १९७ साखर कारखाने सुरु झाले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल १९७ साखर कारखाने सुरू. तर यात 9९ खासगी व 9८ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत १९७ साखर कारखान्यांकडून ८६०.९८ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात १७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल ८७९.१० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. तर गेल्या हंगामात महाराष्ट्राने १०१४ लाख टन उसाचे गाळप केले होते अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा (Sugar extraction) १०.१८ टक्के इतका आहे.
राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १९८.२३ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये १८१.६१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- औरंगाबाद मध्ये देशातील ‘सर्वात उंच’ पुतळ्याचे अनावरण ; क्रांती चौकात प्रचंड जल्लोष !
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी गड-किल्ल्यांचा विकास – अजित पवार
- शेतकरी कर्जमुक्ती, महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा व अन्य विविध विकास योजनांद्वारे नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध – आ
- २३ फेब्रुवारी ते १४ एप्रिलपर्यंत महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अभियान – बच्चू कडू
- छत्रपती शिवाजी महाराजांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत – नरेंद्र मोदी
- जाणून घ्या ; काय आहेत खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
- विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ तारखेला मुंबईत होणार