जाणून घ्या मेथीचे फायदे….

मेथीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. जे की आपल्या आरोग्यसाठी  चांगले असतात. त्यातही मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. बाजारामध्ये भरपूर उपलब्ध असलेली मेथी नियमित खायला हवी. मेथीचा गुणधर्म मुळात गरम आहे त्यामुळे या भाजीच्या सेवनाने अनेक फायदे होतात.

केसांच्या समस्या दूर करते : मेथीची पेस्ट केसांना लावल्यास किंवा मेथीचा आहारात समावेश केल्यास केस काळे आणि चमकदार होतात. केस गळतीवर खोबरेल तेलामध्ये मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. नंतर केसांना हलक्या हाताने मसाज करा.

जाणून घ्या काय आहेत डाळिंब खाण्याचे फायदे…

पचनक्रिया चांगली राहते : शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्याचे काम करते. सकाळी उठल्यावर मेथीचा काढा घेतल्यास बद्धकोष्ठता दूर होते.

कोलेस्ट्रॉल कमी होतो : मेथीचे सेवन केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

डायबिटिजचा त्रास कमी होतो : अशा व्यक्तींसाठी मेथीचे दाणे आणि मेथीची भाजी दोन्ही फायदेशीर ठरतात.

लठ्ठपणा नाहिसा होतो : दररोजच्या आहारात मेथीच्या भाजीचा किंवा दाण्यांचा समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहते.

‘स्ट्रेस’वर रामबाण उपाय

ब्लड प्रेशर राहते नियंत्रणात : मेथीच्या हिरव्या भाजीमध्ये कांदा परतून खाल्याने ब्लडप्रेशरची समस्या दूर होते.

हृदयाचे आरोग्य : मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन घटकामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हृदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतो.

मासिक पाळीत आराम : मासिक पाळीतील पोटदुखी दूर होते. आयर्न तयार करण्यासाठी मेथी फायदेशीर ठरते.