Share

जाणून घ्या बहुउपयोगी कडीपत्याचे फायदे

Published On: 

🕒 1 min read

कोणत्याही भाजीला फोडणी देण्यासाठी आणि तिला सुगंधीत करण्यासाठी कडीपत्याचा उपयोग केला जातो. परंतु कडीपत्यामध्ये असे अनेक पोषक द्रव्य आहे ती आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. कडीपत्याची पान खाल्ल्याने केस काळे, लांबसडक आणि घनदाट होतात.

त्याचप्रमाणे कोंड्याची ही समस्या दूर होते. कडीपत्याची पेस्ट केसांना लावल्याने केस अधिक घनदाट आणि केस गळण्याची ही समस्या दूर होते. कडीपत्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. कडीपत्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

तसेच कडीपत्ता पचनशक्ती वाढवुन वजन कमी होण्यास मदत होते. कडीपत्यामुळे अपचन समस्यांपासून बचाव होतो. तसेच अतिसारावर कडीपत्ता गुणकारी ठरतो. कडीपत्ता खाल्याने पोटातील पित्तदोष कमी होण्यास मदत होते. कडीपत्ता शरीराला कॅन्सर पासून वाचण्यास मदत करतो.

कडीपत्याच्या सेवनाने कफ होत नाही. कडीपत्याच्या पावडरमध्ये एक चमचा मध घालून पेस्ट तयार करा. या पेस्टमुळे खोकल्यापासून आराम मिळेल. तर अशा या बहुउपयोगी कडीपत्याचा आहारात नक्की समावेश करा.

महत्वाच्या बातम्या –

जिल्हाधिकाऱ्यांच्या घरावर सीबीआयचा छापा ; ‘नोटा’ मोजण्यासाठी मागवले ‘मशिन’!

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केला हात पुढे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून देणार 50 लाख

हे आहेत पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे ……

बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या