सीताफळ : नावाप्रमाणेच मधुर आणि शीतल ……. सीताफळ हे आज प्रत्येकाला माहित असलेले फळ आहे … सीताफळ , रामफळ आणि लक्षमणफळ अशी तीन फळे आपणास बाजारात मिळतात. सीताफळ हे मूळ अमेरिकेतले फळ असून ते भारतात कधी आले याचे फारसे संदर्भ आढळत नाहीत …
सिताफळ आईसक्रिम
साहित्य : दूध – ५०० मिलि, साखर – ८ ट॓बल स्पून, आईस्किम ईसेंन्स – १/४ टी स्पून, GMS Powder – १ ट॓बल स्पून + १ टी. स्पून, CMC Powder – १/४ टी स्पून cornflour – १ ट॓बल स्पून + १ टी. स्पून, सिताफळांचा गर – १ वाटी किंवा १० मध्यम आकारांच्या सिताफळांचा गर ,अॅल्युमिनियमचा डबा झाकणासहित.
कृती : प्रथम एका स्टीलच्या पातेल्यात दूध, साखर, GMS Powder , CMC Powder, cornflourएकत्र करा. पातेल गॅसवर मंद आचेवर ठेवा व सतत चमच्याने ढवळत रहा. त्यानंतर १० मिनटांनी मिश्रण थोड दाट होईल. गॅस बंद करुन त्यात आईस्किम ईसेंन्स घालून ढवळावे. मिश्रण थंड झाल्यावर अॅल्युमिनियमच्या डब्यात ओतून झाकण लावून डबा डिप फ्रिजर मध्ये ठेवा आणि डिप फ्रिजर HIGH वर ठेवा. ६ तासांनी आईस्किम सेट होईल.
सेट झालेल्या मिश्रणाचे दोन भाग करा. अर्ध मिश्रण म्किसरच्या भांडयात घालून ५ मिनट फिरवाव. उरलेल्या अर्ध्या मिश्रणात अर्धि वाटी सिताफळचा गर घालून, म्किसरच्या भांडयात घालून ५ मिनट फिरवाव. अॅल्युमिनियमच्या डब्यात दोन्हि मिश्रण घालून त्यात उरलेला सिताफळचा गर घालून, मिश्रण चमच्याने व्यवस्थित ठवळा. डब्याला झाकण लावून डिप फ्रिजर मध्ये ठेवा आणि डिप फ्रिजर MEDIUM वर ठेवा. मिश्रण ४ तासांनी सेट होते.
टिप : अॅल्युमिनियमचा डबा झाकणासहित नसेल तर केकच अॅल्युमिनियमच भांड वापराव व त्यावर एक ताट ठेवा.
सीताफळ बर्फी
साहित्य : सीताफळ गर – २ पिकलेल्या सीताफळांचा गर [ हे सर्वात किचकट काम रे बाबा ] , साय (क्रिम) – आर्धी वाटी, साखर – ३ चमचे ( सीताफळाच्या गोडीनुसार कमी-जास्त प्रमाण करावे), दुध – १ कप, तांदळाचे पीठ – १.५ चमचा, तुप – १.५ चमचा.
कृती : सीताफळाचा गर ( एकूण गरापैकी ७५% ), साय आणि साखर मिक्सरमधे एकदम बरीक करुन घ्यावे. उरलेला २५% गर जरासा रवाळसा बरीक करावा. ( रवाळ ह्या साठी कारण बर्फी खातांना सीताफळ खाण्याचा फील आला पाहिजे, ते जास्तीत जास्त natural वाटलं पाहिजे.) एका कढईमधे १.५ चमचा तुप घेऊन त्यावर १.५ चमचा तांदुळाचं पीठ मध्यम आचेवर खरपुस भाजुन घ्यावं (तांदळाचं पीठ “हेnding” म्हणुन वापरायचं, शिवाय तांदळाच्या पीठाला विशेष वास नसल्याने सीताफळाचा वास कायम राहतो, म्हणुन तांदळाचंच पीठ. तांदळाचं पीठ भाजुन झालं की त्यातच अर्धा कप दुध घालुन ते व्यवस्थीत हालवुन घ्यावं, गुठळ्या/गाठी होणार नाहि हि दक्षता घेत हलवत रहावे.
एकदा बुडबुडे यायला लागले की सीताफळाचं मिक्सर वर बारीक केलेलं मिश्रण ह्यात मिक्स करुन पुन्हा व्यवस्थीत हलवुन घ्यावे, गरज असल्यास थोडं थोडं दुध टाकत रहावं. वड्या पाडु शकू असा अंदाज अला वा तेवढा घट्टपणा आला की हे मिश्रण एका तटात थोडं तुप पसरुन (वड्या चीकटु नये म्हणुन) त्यावर हे मिश्रण पसरावे. हे ताट -मिश्रण फ्रिज मधे सेट होऊ द्यावे. २-३ तासांनंतर बाहेर काढुन वड्या पाडुन घ्याव्या. ह्या वड्या जरा नरमच असतात (नाहितरी बर्फी थोडी मऊ असतेच म्हणा). तर अशी ही "रिची-रीच" सीताफळ बर्फी खाण्यासाठी तयार आहे.
सीताफळ रबडी
साहित्य : १ लिटर दूध, पाव वाटी साखर, १/२ चमचा दूध मसाला किंवा वेलची-जायफळ पूड, १ किलो /४ नग सीताफळांचा गर.
कृती : १ लिटर दूध जाड बुडाचे पातेले/कढई//लहान कूकर किंवा नॉन स्टीक पॅन मधे एकदा चांगले उकळवा. आता त्या पातेल्यात एक उलथने किंवा झारा दुध ढवळण्यासाठी ठेवा. गॅस मंद आचेवर ठेवा. अधुन मधुन दूध झा-याने ढवळत रहा. साधारण ३० मिनिटाने दू धात साखर व दूध मसाला घाला व छान ढवळुन घ्या. १० मिनिटाने गॅस बंद करा. दुस-या एखाद्या पातेल्यात हे आटवलेले दुध काढुन घ्या. हे दूध थंड होण्यासाठी ठेवा. जर लवकर थंड करुन हवे असेल तर , आकाराने मोठ्या पातेल्यात थोडे पाणी घेवुन त्यात हे आटवलेले दूध असलेले पातेले ठेवा व १० -१० मिनिटानी गरम झालेले पाणी बदलुन तितकेच दुसरे थंड पाणी घाला.
दुधाची रबडी तयार झाली. ही रबडी घट्ट हवी असेल तर अर्धी वाटी मिल्क पावडर थोड्या दुधात मिसळुन घालावी. सीताफळाच्या बीया वगळुन गर काढुन घ्या. थंड झालेल्या रबडीत सीताफळा चा गर मिसळुन छान ढवळुन घ्या. फ्रीज मधे ठेवुन गार करा. मस्त सीताफळ रबडी चा आस्वाद घ्या.
जॅम
गराच्या वजनाएवढी साखर मिसळुन तो गरम करावा, सतत ढवळत राहावे. नंतर 2-5 ग्रॅम प्रतिकिलो गर या प्रमाणात सायट्रिक आम्ल मिसळुन ते मिश्रण घट्ट होईपर्यंत म्हणजेच तुकड्यांत पडेपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचा टिएसएस 68-69 टक्के असतो. तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरुन बाटल्या थंड करुन, त्यावर मेणाचा थर देऊन किंवा एल्युमिनियम फॉईल लावुन, हवाबंद करुन झाकण लावावे. बाटल्या थंड जागी साठवाव्यात.
सरबत
गर 15 टक्के साखर, 15 टक्के सायट्रीक आम्ल, 0.25 टक्के घेऊन उत्तम प्रकारे सरबत करता येते. प्रथम गर घेऊन त्यामध्ये प्रमाणात मोजुन घेतली साखर, सायट्रीक आम्ल व पाणी मिसळुन ते चांगले ढवळुन घ्यावे. हे मिश्रण मलमलच्या कापडातुन गाळावे. जर हे सरबत जास्त काळ साठवुन ठेवायचे असल्यास ते गरम करुन त्यामध्ये 100 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड मिसळुन निर्जंतुक केलेल्या 200 मि.ली. च्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरुन, झाकण लावावे (1-2 महिने).
सीताफळ टॉफी
सिताफळाचा 1 किलो गर घेऊन त्यात 2 किलो साखर व 1 किलो द्रव ग्लुकोज टाकावी. हे मिश्रण साधारण 95 टक्के साखरेचे प्रमाण येईपर्यंत किंवा गोळी तयार होईपर्यंत उकळावे. थंड होत असतांनाच साच्यात टाकुन वड्या पाडाव्यात, तयार झालेली टॉफी थंड झाल्यावर सिलोफेनच्या वेष्टणात टाकावी.
श्रीखंड
सिताफळाचा गर 100 ग्रॅम, साखर 500 ग्रॅम व 400 ग्रॅम चक्का मिसळुन मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे. त्यामध्ये ड्रायफ्रुटस टाकुन फ्रिजमध्ये ठेवुन थंड करावे.
महत्वाच्या बातम्या –
आदिवासी महामंडळाचा 1 कोटी 34 लाख रुपयांचा तांदूळ घोटाळा
परदेशातून कांदा आयात करणे हे सरकारचे चुकीचे धोरण-जितेंद्र आव्हाड