लघवीच्या मार्गात तयार होणारा कठीण स्फटिकजन्य पदार्थ मुतखडा म्हणून ओळखला जातो. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ एकाच जागी जमा होऊन मुतखडा निर्माण करतात. मूत्रमार्गात जंतू संसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे रूपांतर मुतखड्यात होते.
ही आहेत मुतखड्याची लक्षणे
मुतखड्याची लक्षणे साधारणपणे दिसून येत नाहीत. मुतखड्याची मूत्रमार्गात हालचाल होऊन अडथळा येतो त्यावेळी तीव्र वेदना होतात. ज्या बाजूस मुतखडा असेल त्या बाजूस जास्त वेदना होतात. पाठ, पोट, ओटीपोटात वेदना होतात. लघवीतून रक्त जाते. लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची भावना होते. लघवी करताना जळजळ होते. जंतुसंसर्ग होऊन थंडीताप येतो.
पांढऱ्या केसांवर काही घरगुती उपाय
काही घरगुती उपाय
-अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पिण्याने १५ मिनिटांत पोटदुखी थांबते.
-सराटा (काटेगोखरू)चा काढा तूप टाकून दिल्यास, मुतखडा पडून जाण्यास व वेदना कमी होण्यास मदत होते.
-खडा लहान असल्यास आणि जुना नसल्यास मेंदीच्या सालीचे बारीक वाटण करून चूर्ण सकाळी अर्धा चमचा पाण्याबरोबर नियमित घेतल्याने खडा विरघळून लघवी वाटे निघून जातो.
-कुरडू नावाच्या वनस्पतीची अथवा वायवर्ण्याची साल याचा रस अथवा काढा घेतल्याने वेदना कमी होते.
-कडुलिंबाच्या पाल्याची राख दोन ग्रॅम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर पडतो.
मुतखडा न होण्यासाठी काही उपाय
जास्तीत जास्त पाणी पिणे हा निरोगी आयुष्यासाठी आणि मुतखड्यासारख्या विकारावर आळा घालण्यासाठी उत्तम उपाय आहे. मुतखड्यांना रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज पुरेसे पाणी म्हणजेच ८ ते १२ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
आहारामधील सोडियम आणि प्राण्यांच्या मांसातून मिळणारी प्रथिने नियंत्रित ठेवल्यास मुतखड्यांचा त्रास टाळण्यास मदत होऊ शकते. मुतखडा होण्याची प्रवृत्ती टाळण्यासाठी उसाचा रस, काकवी यांचे सेवन करावे.
तुमच्या शरीरात Vitamin D ची कमतरता तर नाही ना? पाहा Vitamin D च्या कमतरतेची लक्षणं https://t.co/U1B8JJ7gQq
— KrushiNama (@krushinama) February 9, 2020