दुधात ‘या’ गोष्टी मिसळून प्या, डायबिटीस रुग्णांसाठी आहे खूप फायदेशीर

भारतात डायबिटीस च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रक्तात ग्लुकोज शुगरची मात्रा वाढल्यामुळे डायबिटीस होते. त्यामुळेच आयुर्वेदात डायबेटीसला ‘मधुमेह’ म्हटले जाते. चरक, सुश्रुत यांसारख्या महान वैद्यांनी आपल्या संहितांमध्ये डायबिटीस वरील उपचार पद्धती नमूद केल्या आहेत. आपल्या शरीरात सतत पचनाच्या व इतर मेटाबॉलिक क्रिया घडत असतात. या क्रियांमध्ये इंसुलिन हा एक महत्वाचा पाचक रस आहे. मात्र शरीरातील इंसुलिनचं प्रमाण कमी-जास्त झाल्यामुळे डायबिटीस होते.

डायबिटीसच्या रुग्णांना आपल्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. आहाराबरोबरच वेळेची काळजी घेणे हे डायबिटीसच्या रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असते. कारण डायबिटीस रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती देखील हळूहळू कमकुवत होत असते. त्यामुळे शरीरात इतर रोग देखील निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे डायबिटीज रुग्णांसमोर दूध प्यावे की नाही असा प्रश्न नेहमी उद्भवलेला असतो. पण डायबिटीस रुग्णांनी आपल्या दुधात या गोष्टी मिसळून प्यायल्यास त्याचे कोणते दुष्परिणाम होणार नाही.

डायबिटीस रुग्णांनी दुधात पुढील गोष्टी मिसळा 

बदाम

डायबिटीस रुग्णांनी दुधामध्ये बदाम मिसळून पिलास त्यांना ते फायदेशीर ठरू शकते. बदमामध्ये मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई, विटामिन डी, प्रोटीन आणि फायबर आढळतात. त्याचबरोबर बदामामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. दुधामध्ये बदाम मिसळल्यास दुधातल्या कॅलरीज कमी होतात.

दालचिनी

तुम्ही जर डायबिटीस रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या दुधात दालचिनी मिसळून दूध पिऊ शकतात. दालचिनी हा एक मसाल्यामध्ये वापरला जाणारा पदार्थ असून तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषता दालचिनी हा डायबिटीस रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. दालचिनीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी तत्व साखरेची पातळी सांभाळण्यास मदत करतात. त्यामुळे दालचिनी डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

हळद

हळदीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक डायबिटीज रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे हळद घालून दुधाचे सेवन करणे डायबेटीस रुग्णांसाठी नेहमी फायद्याचे ठरू शकते. हळदीमध्ये आढळणारे घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे दुधामध्ये हळद मिसळून पिणे डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या –