Winter Health Care | हिवाळ्यामध्ये एक चमचा तूप खाऊन ‘या’ आजारांपासून रहा दुर

टीम महाराष्ट्र देशा: ‘तूप खाऊ नकोस जाड होशील’ असे आपण नेहमी ऐकत असतो. त्याचबरोबर तूप खाल्ल्याने आपले वजन वाढेल म्हणून आपण तुपाचे सेवन करणे टाळतो. पण असे नसून सकाळ संध्याकाळ दररोज एक चमचा तूप खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर एखादी व्यक्ती आरोग्याशी संबंधित कोणत्या आजाराने ग्रस्त असेल तर तूप निश्चितच त्यांच्यासाठी हानिकारक ठरू … Read more

दुधात ‘या’ गोष्टी मिसळून प्या, डायबिटीस रुग्णांसाठी आहे खूप फायदेशीर

भारतात डायबिटीस च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रक्तात ग्लुकोज शुगरची मात्रा वाढल्यामुळे डायबिटीस होते. त्यामुळेच आयुर्वेदात डायबेटीसला ‘मधुमेह’ म्हटले जाते. चरक, सुश्रुत यांसारख्या महान वैद्यांनी आपल्या संहितांमध्ये डायबिटीस वरील उपचार पद्धती नमूद केल्या आहेत. आपल्या शरीरात सतत पचनाच्या व इतर मेटाबॉलिक क्रिया घडत असतात. या क्रियांमध्ये इंसुलिन हा एक महत्वाचा पाचक रस आहे. मात्र … Read more

मसूर मिश्र लागवड शेतकऱ्यांना ठरेल फायदेशीर; जाणून घ्या कसे ते…..

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. दिवसेंदिवस भारतातील कृषीक्षेत्र मजबूत होत चालले आहे. सर्व समस्यांना मात देत भारतीय शेतकरी उत्पादनात वाढ करत आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत कृषी उत्पादने बाबतीत भारत हा स्वावलंबी बनत चालला आहे. देशातील शेतकरी प्रत्येक हंगामात कडधान्य पिकाची लागवड करत आहे. पण बदलत्या वातावरणामुळे खरीप हंगामात ते बहुदा शक्य होत नाही. … Read more

जायफळचे हे औषधीय गुण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या जायफळचे अनेक फायदे…

सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय असलेले जायफळ आपल्या सर्वांना परिचित आहे. पदार्थांमध्ये वापरला जाणारा एक मसाला म्हणून जायफळाची ओळख आहे. जायफळ नेहमी आपल्या चवीने आणि सुगंधाने अन्नाला परिपूर्ण करते. म्हणूनच जायफळ अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. पण पदार्थांसोबत जायफळ हा बऱ्याच आजारांवर देखील रामबाण इलाज आहे. जायफळामध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटिबायोटिक गुण आढळतात. त्यामुळे जायफळाचे सेवन तुम्हाला अनेक … Read more

पेरणी करताना विजेच्या धक्क्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू, मुलाला साहेब करण्याचं स्वप्न अधुरं 

उस्मानाबादेत जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बोर्डा येथील रामेश्वर मनोहर शेळके या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शनिवारी  पेरणी सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली. त्यामध्ये बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रामेश्वर शेळके हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी शेतीसोबतच ते मजुरीचे कामही करतात. दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीची लगबग सुरु आहे. चार पैसे मिळावेत … Read more

जाणून घ्या राजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे

‘राजगिरा’ आपल्याला नवरात्री, एकादशी अशा उपवासांना आठवतो. पण एवढा मर्यादीत त्याचा ऊपयोग आहे का??? नक्कीच नाही. राजगिरा ही अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. राजगीऱ्यास रामदाना,अमरनाथ म्हणुनही ओळखले जाते. अमेरीकेतून भारतात आलेली ही वनस्पती आहे. धान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे तिपटीने अधिक असते. त्यामुळे हाडांना मजबुती मिळते. राजगिऱ्यात विशेषतः प्रथिने, तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिज द्रव्ये यांचे … Read more

बाजार समित्यांमध्ये मुगाच्या दरात वाढ

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकरी खरीपाच्या पेरणीची घाई करीत आहेत. अशात बाजार समित्यांमध्ये मुगाचे दर वाढून ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर झाले आहेत. बाजारात सध्या उन्हाळी मुगाची खरेदी होत असली तरी, पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करणाऱ्या शेतकऱ्यांना या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे. शासनाने गतवर्षीच्या हंगामात मुगाला … Read more

बी- बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

जालना : मागील वर्षी पाऊस नसल्याने शेतक-यांच्या हातून खरीप व रबीचे पीक गेले आहे. यामुळे यंदा वेळेवर पाऊस पडेलं. पीक जोमाने येईल. या आशेवर शेतकरी उन्हाळ्यातच शेतीच्या कामाल लागला होता. त्यामुळे कृषी विभागातर्फे वेळेवर शेतक-यांनी बी- बियाणे मिळावे, यासाठी परिपूर्ण तयारी करण्यात आली होती. दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पाऊस बरसेल आणि पेरणीचा प्रश्न … Read more

आवक कमी झाल्याने पालेभाज्या कडाडल्या

गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांवर त्याचा परिणाम झाला असून कडधान्याची आवक घटल्याने त्यांचेही भाव वाढत गेले. त्यात यंदाही जून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असला तरी पाऊस नसल्याने व उन्हाच्या झळा कायम असल्याने भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होत आहे. भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून त्यांचे भाव वाढत आहे. पालेभाज्यांचे भाव सर्वाधिक वाढत असून मेथीची जुडी … Read more

शेतकऱ्यांचे हाल ; कर्जमाफी नाही, पीक कर्जही मिळेना!

अकोला : दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांसमोर खरीप पेरणीचा खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत तोंडावर आलेल्या खरीप पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न अकोला जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ शेतकऱ्यांसमोर  निर्माण झाला आहे. कर्जमाफी मिळाली नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले … Read more