नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची १०६ क्विंटल आवक

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची आवक १०६ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४६२५ दर मिळाला. वांग्यांची १६८ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १७०० ते ३७०० असा दर होता. फ्लॉवरची आवक ३०७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७२० ते १४२० दर होता कोबीची आवक ७१० क्विंटल झाली. तिला सरासरी ४१५ ते ८३० असा दर होता.  पिकॅडोरची आवक ३५ क्विंटल झाली. तिला ३७५० ते ४६२५ दर होता.

कोथिंबीर १८ हजार रुपये शेकडा बाजारभावाने विक्री

कारल्याची आवक १३४ क्विंटल झाली. त्यास १६७० ते २९१५ असा दर होता. दोडक्याची आवक ३२ क्विंटल झाली. त्यास २५०५ ते ३७५० असा दर होता.  गिलक्याची आवक २१ क्विंटल होती. त्यास २५०५ ते ३३३५ दर होता.

कांद्याचे भाव घसरले , लासलगाव आणि पिंपळगावात आवकही घटली

हिरव्या मिरचीची आवक ११० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १७६० ते ३००० प्रतिक्विंटल दर होता. गवारीची आवक ८ क्विंटल झाली. तिला ३५०० ते ७००० असा दर होता. . डांगराची आवक ३२ क्विंटल झाली. त्यास ८०० ते १४०० दर होता. काकडीची आवक ७६८ क्विंटल झाली. तिला ७५० ते १७५० असा दर होता.