चिकू विकणाऱ्या महिलांना बोर्डी चिकू महोत्सवात महागड्या स्टॉलवर चिकू विकता आले नसले तरी सुद्धा बोर्डी येथील चिकू महोत्वसाबाहेर पडणाऱ्या पर्यटकांना वाटेवरचे चिकू आकर्षण ठरले.चैतू जयवंत चिमडा आणि तिच्या बाजूला एक महिला या महोत्सवाच्या बाहेर पिकलेल्या चिकूच्या टोपल्या घेऊन बसल्या होत्या.
अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी ‘या’ महत्वाच्या घोषणा !
सुकवलेल्या चिकूचे चिप्सही विक्रीस होत्या. त्यातून त्यांनी प्रत्येकी ७०० रुपये कमावले असल्याचे सांगितले आहे. ज्या फळाच्या नावाने हा महोत्सव भरवला जातो तेच घोलवडचे चिकू बाहेर वाटय़ावर उपलब्ध झाले. त्यांनी पिकलेले चिकू २० रुपये वाट्यावर लावले होते. विशेष म्हणजे चिकू महोत्सवामध्ये तयार चिकू ४० रुपये किलोने विकले गेले.वर्षभर बाजारात वाटय़ावर चिकू विकणाऱ्या महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिवसभरात टोपली संपली म्हणजे त्यांचा दिवस सार्थकी लागतो असे त्यांनी सांगितले.
रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता https://t.co/wi31NZm4GA
— KrushiNama (@krushinama) February 4, 2020