थंडीत वाढ झाल्याने कापणी योग्य केळी जेमतेम तयार

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पारा १० अंश सेल्सिअसपेक्षाही खाली घसरला आहे. थंडीत वाढ झाल्याने कापणी योग्य केळी जेमतेम तयार होत आहे. सध्या रावेर पट्ट्यातून दररोज फक्त १७ ते १८ आणि सावदा पट्ट्यातून दररोज केवळ २० ट्रक केळी उत्तर भारतात पाठवली जात आहे.

सोयाबीन पेंड निर्यातीवर १५ टक्के अनुदान देण्याची केंद्राकडे मागणी ; पाशा पटेल

१५० ते २०० ट्रक केळी लिलाव होणाऱ्या बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत फक्त २२ ट्रक केळीचा लिलाव झाला.जिल्ह्यात कापणीयोग्य केळीचे प्रमाण कमी झाले. उत्तर भारतातून केळीची मागणीही खूपच कमी झाली आहे. उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या भागात देखील केळीची मागणी बऱ्यापैकी कमी झाली आहे. सध्या राजस्थानमध्ये जिल्ह्यातील केळीची मागणी आहे.

डाळिंबाचे बाजारभाव कोसळले

सध्या मागणी कमी, केळीची कापणी ही कमी आणि त्यामुळे भावही कमी आहेत. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून थंडी कमी होत जाऊन ऊन व तापमान वाढत जाणार आहे. यामुळे केळी कापणीसाठी तयार होण्याचे आणि कापणीचे प्रमाणही वाढणार आहे. या काळात निर्यातक्षम केळी मालाची कापणी ही सुरू होणार आहे. जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात तालुक्यातून केळीची निर्यात सुरू होईल अशी चिन्हे आहेत.