भाकरीबरोबर जवस किंवा अळशीची चटणी हा मेनू खास ग्रामीण असला तरी जवसाचं महत्त्व सगळ्यांना कळायला लागलं आहे. जवसच्या नियमीत सेवनाने रक्तातील साखर, ट्रायग्लिसराईड्स, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल आटोक्यात राहू शकतात.
– पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवस बांधून ठेवावे.
– हिरड्या मजबूत करण्यासाठी आणि दात दुखत असल्यास त्यावर जवसचे तेल फायदेशीर ठरते.
– एखाद्या ठिकाणी भाजलं असेल तर त्या ठिकाणी जवसचं तेल आणि चुन्याची निवळी एकत्र करुन बांधावी. यामुळे जखम लवकर बरी होते.
-आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते.
– जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे तापाचे प्रमाण देखील कमी होईल.
चहामधील ‘हे’ पदार्थ ठरतील लाभदायक https://t.co/9dZJirXbiM
— KrushiNama (@krushinama) January 13, 2020