राज्यात ३६ लाख क्विंटल कापसाची खरेदी

गेल्या हंगामात कापसाचे दर साडेपाच हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले होते. त्यामुळे या वर्षीचा हंगामदेखील कापूस उत्पादनाला पोषक राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र नागपूर बाजारात दर कोसळल्याने पणन महासंघाला कापूस देण्याकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत तब्बल ३६ लाख क्विंटल कापसाची खरेदी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने केली आहे. येत्या काळात ही खरेदी ४० लाख क्विंटलचा टप्पाही पार करेल, अशी शक्यता आता वर्तविली जात आहे.

शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या पाठीत पुन्हा खंजीर खूपसला – भाजपची टीका

त्यातच बाजारात ४५०० ते ५००० रुपये क्विंटल दराने कापसाचे व्यवहार होत आहेत. कापूस उत्पादकांची अशी चौफेर कोंडी झाली असतानाच बाजारात हस्तक्षेप करीत सीसीआय व पणन महासंघाकडून हमीभावाने खरेदीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ ११३ केंद्रांच्या मध्यमातून कापूस खरेदी करीत आहे. या वर्षीदेखील तीच स्थिती निर्माण झाल्याने आजवर सुमारे ३६ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.