मानसिक थकवा दूर करतात हे आयुर्वेदिक तेल,कुठले ते पाहा

आपली झोप कितीही झाली तरीही सातत्यानं आपल्याला थकल्यासारखं वाटत असतं. बऱ्याचदा आपल्याला काही काम न करताही थकवा जाणवतो. कधीकधी डोकं जड होतं तर काहीवेळा अंग दुखत राहातं. आपल्या शरीरातील ऊर्जा जास्त खर्च झाल्यानं सतत आपल्याला थकल्यासारखं होतं. आपल्याला जो थकवा सोसावा लागतो त्याचे मूळ आपल्या मानसिकतेमध्ये असते,  कंटाळा, संताप, आपल्या कामाचे कौतुक न केल्याबद्दल, काळजी, चिंता या भावना बैठे काम करणाऱ्यांना थकवतात. त्यामुळे अपेक्षित काम त्याच्याकडून होत नाही. मग माणूस उदासवाणा होतो. त्या थकव्याला आपण मानसिक थकवा म्हणतो .

दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं – बच्चू कडू

चला तर मग जाणून घेऊयात कुठले आयुर्वेदिक तेल हे मानसिक थकवा दूर करतात –

कॅमोमाइल ऑइल

बाजारात दोन प्रकारचे कॅमोमाइल तेल उपलब्ध आहेत. रोमन कॅमोमाइल आणि जर्मन कॅमोमाइल असं दोन प्रकार उपलब्ध आहेत. दोन्ही तेलांचा वापर त्वचेवर लावण्यासाठी केला जातो. तसंच, थकवा घालवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पोटदुखीच्या वेळेस हे तेल वापरल्यास आराम पडतो.

गैरहजर ग्रामसेवकांवर आता पुणे जिल्हा परिषद करणार कारवाई

लव्हेंडर तेल

लव्हेंडर तेलाची सुगंध मन शांत करते. यामुळं मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. सौम्य सुगंधाच्या या तेलात मन हलकं होण्याची क्षमता आहे. या तेलानं मसाज करण्यासाठी दोन चमचे एरंडेल तेलात दोन थेंब लव्हेंडर तेल टाका. या तेलानं पूर्ण बॉडि मसाज घ्या. मानसिक व शाररिक थकव्याबरोबरच त्वचा व मुरुमांची समस्यादेखील दूर होते.

निलगीरीचे तेल

सोलापूर जिल्हा परिषदेकडून हातपंप दुरुस्तीसाठी ५० लाख, पाइप खरेदीसाठी ४१ लाख रुपयांचा निधी

पुदीन्याच्या तेलाप्रमाणेच निलगीरीचे तेलसुद्धा मानसिक व शाररिक थकवा, वेदना, पेटके येणाऱ्या समस्यांपासून आराम देते. शरीरावर आलेली सूज कमी करून त्वचा निरोगी ठेवते. या तेलातील अँटीबॅक्टेरिअल गुणधर्मांमुळं त्वचा निरोगी राहते.

पुदीन्याचे तेल

पुदीनाचे तेलाच्या सुवासामुळं लगेचचं मेंदूला आराम मिळतो. हे तेल थकवा घालवण्याबरोबरच वेदना, पोटदुखी, मासिक पाळीचा त्रास, डोकेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्या दूर करून लगेच आरोम देते.

महत्वाच्या बातम्या –

नागपुरात कपाशीला गुलाबी बोंडअळीचा धोका

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळल्याने सात ऊसतोड महिला कामगारांचा मृत्यू