खोकल्यावर काही घरगुती उपाय

सर्वसाधारणपणे सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे सर्दी-खोकला होत असतो. खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज येणे, ताप येणे यांसारखे त्रास होत असतात. त्याशिवाय खोकल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखीही होत असते. या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेत असतात. परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो.  या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा होत असतो. या उपायांमुळे शरीराला कोणतंही नुकसान पोहचत नाही.

अळूची पाने खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

आले 

आल्यामध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टिऑक्सिडेंट गुण असतात. खोकल्यामुळे होणारे इतर त्रासही आल्याचा रस घेतल्याने कमी होतात. खोकल्यामुळे होणारा कफही आल्याचा रस घेतल्याने कमी होता.

हळद 

हळदीमध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-फंगल गुण असतात. जे खोकला कमी करण्यास मदत करतात. तसेच हळद कफही कमी होण्यास फायदेशीर आहे. घसा दुखत असल्यास किंवा सूज आली असल्यास हळदीच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानेही आराम पडतो.

जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे….

जीरे 

जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन आणि अॅन्टिऑक्सिडेंट असतात. जे बॅक्टेरिया, जंतू नष्ट करतात. सर्दी-खोकल्यावर जीरं खाण्याने फायदा होतो. खोकल्यावर कच्चं जिरं किंवा जिऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

मध 

मध खोकल्याची समस्या कमी करतो. मधामध्ये अॅन्टिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. जे सर्दी-खोकल्याची लक्षणं कमी करतात. खोकल्यामुळे होणाऱ्या इतर समस्याही मधामुळे कमी होण्यास मदत होते.